म्हणून सुका मेवा खाणे स्वास्थ्यासाठी फायदेशीर.
सुका मेवा खाणे शरीरासाठी आणि स्वास्थ्यासाठी फायदेशीर असते. ड्रायफ्रूट्समध्ये प्रोटीन, फायबर, फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी-6 आणि खनिज पदार्थांचे भरपूर प्रमाण असते.थंडीचा सिझन सुरू झाला की, मुलांना सुका मेवा खायला देणार्‍यांची संख्या मोठी आहे. सुका मेव्याच्या सेवनामुळे शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला ड्रायफ्रूट्सचे फायदे आणि गुण सांगणार आहोत.
सुके अंजीर

सुके अंजीर खाल्ल्यामुळे भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. यामध्ये फायबर पोटॅशियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. जाड व्यक्तींनी सुके अंजीर खाल्ले पाहिजे. यामुळे त्यांचे वजन कमी होण्यास मदत होते.

पिस्ता

पिस्ता खाणे हृदय रोगींसाठी लाभदाय असते. पिस्ता हा व्हिटॅमिन बी-6 चा प्रमुख स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन आणि खनिज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. डायटिंग करत असलेल्या महिलांसाठी पिस्ता खाणे फायदेशीर असते.

किशमिश

किशमिशचे सेवन केल्यामुळे गॅसेस कमी होण्यास मदत होते. किशमिश हे उत्तम अँटीऑक्सीडेंट असल्याचे मानले जाते. यामुळे शरीरातील स्टॅमिना वाढण्यास मदत होते. किशमिशच्या सेवनामुळे अल्जायमरसारख्या गंभीर आजारापासून आराम देण्यास मदत होते. लक्षात ठेवा : पाण्यात भिजवलेले किशमिश खाणे फायदेशीर असते.

शेंगदाणे-

पीनट्समध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन उपलब्ध असते. तसेच यामध्ये अँटीऑक्सीडेंट्सदेखील असतात. पीनट्स डब्यामध्ये बंद करून फ्रिजमध्ये ठेवल्यास 6 महिने खराब होण्याची भीती नसते.

लक्षात ठेवा – ज्या व्यक्तींना अस्थमाचा त्रास आहे त्यांनी आणि गरोदर काळात पीनट्सचे सेवन करू नये. पीनट्स गरम असल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.

बदाम

बदामात असलेले 65 टक्केे मोनोसॅच्युरेटेड फॅट शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. बदामात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि फायबर उपलब्ध असते. कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने महिलांनी याचे सेवन करणे फायद्याचे असते. बदामाच्या सालामध्ये फ्लेवोनॉइड्स नावाचे अँटीऑक्सीडेंट असते. त्यामुळे बदाम खाताना सालासकट खावा. यामुळे हृदय आणि रक्त धमन्या सुरक्षित ठेवण्यास मदत होते. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण बदामामध्ये कमी असते.

काजू

काजूला ड्रायफ्रूट्सचा राजा म्हटले जाते. काजू प्रोटीन, मिनरल सॉल्ट, जिंक, आयर्न, फायबर आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे. यामुळे शरीरास ऊर्जा मिळण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण होते.

लक्षात ठेवा – काजू जास्त खाऊ नये. यामुळे तुम्हाला खोकल्याचा त्रास होण्याची भीती असते.

अक्रोड

अक्रोडमध्ये उपलब्ध असलेले फॅट आणि पौष्टिक तत्व शरीरात इन्सुलिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. एग्जीमा आणि अस्थमा असणार्‍या व्यक्तींनी अक्रोड खाणे फायद्याचे मानले जाते. अक्रोडमुळे टाइप टू डायबेटीस असणार्‍या व्यक्तींना हृदय रोग होण्याची भीती कमी होते.
थोडे नवीन जरा जुने