म्हणून वजन वाढतसाखरेच्या सेवनाने वजन वाढते हे मत सर्वत्र पक्के झाले होते, परंतु भारतीय आहाराचे स्वरूप पाहता गोड खाणे सोडणे शक्य नाही. परिणामी मधुमेही रुग्णांशिवाय निरोगी व्यक्तीदेखील कृत्रिम गोडव्याला साखरेचा पर्याय म्हणून वापरू लागले आहेत, परंतु याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

तंदुरुस्त राहण्यासाठी अनेकजण साखरेऐवजी कृत्रिम गोडव्याचे (आर्टिफिशियल स्वीटनर)चा वापर करतात. पण असे करणे चुकीचे आहे.
जाणून घ्या कृत्रिम गोडव्याचे काय आहे सत्य ?
शुगर फ्री म्हणजे डायट फ्रेंडली नाही
शुगर फ्री म्हटल्यावर लोकांच्या मनात लो-कॅलरी किंवा फॅट फ्रीची प्रतिमा उभी राहते. प्रत्येकवेळी हे खरे असेल असे नाही. आर्टिफिशियल स्वीटनर्समध्ये केमिकल असतात. जे साखरेप्रमाणे गोड चव देतात, परंतु याला जेव्हा इतर खाद्यपदार्थांमध्ये मिसळले जाते तर इतर खाद्य साहित्यात कॅलरी आणि फॅटचे प्रमाण योग्य असेलच असे नाही. उदा. शुगर फ्री मिठाईसाठी वापरण्यात येणारा मावा किंवा मैदा मधुमेही रुग्णांसाठी नुकसानदायी ठरतो.


हे आहेत काही दृष्परिणाम
अनेक प्रकारचे स्वीटनर्स बाजारात उपलब्ध आहेत. ज्याचे दृष्परिणाम अत्यंत घातक अशा प्रकारचे आहेत.

एस्पारटेम : हा एक सर्वसामान्य स्वीटनर असून अनेक ब्रँड याचा वापर करतात. या स्वीटनरच्या जास्त वापराने हॅल्युसिनेशनपासून ब्रेन ट्यूमरपर्यंत अनेक आजार होण्याचा धोका आहे.


सुक्रालोज : दीर्घकाळापर्यंत याचा वापर केल्यास लिव्हर, किडनी वाढते आणि थीमस ग्लँड आकुंचन पावते. याशिवाय त्वचेवर रॅशेज, भीती वाटणे, अतिसार, डोकेदुखी, पोटदुखी सारखे दुष्परिणाम दिसून येतात.


नैसर्गिक गोडव्यासाठी
तुम्ही जर मधुमेहाने पीडित नसाल तर साखरेच्या जागी नैसर्गिक गोडवा असणारे पदार्थ वापरू शकता. गूळ, मध हे यासाठी उत्तम पर्याय ठरतात.


हेदेखील जाणून घ्या
फक्त चहा-कॉफी किंवा मिठाईत साखर असते असे नाही, तर कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम, स्नॅक्स, गोड मका, गोड फळांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात शुगर असते.


मी पूर्वी आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करत होते, परंतु त्याचे दुष्परिणाम माहिती झाल्यानंतर मी साखर घेणे सुरू केले.
थोडे नवीन जरा जुने