म्हणूनच कम्फर्ट झोनमधून वेळीच बाहेर पडा
जर तुम्ही एकाच प्रकारच्या भूमिकेत १५ वर्षे काम केले असेल, तर तुमचा अनुभव हा एक वर्षाचाच धरला जातो. कारण, कामातील वैविध्याचा अभाव आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये असतो. म्हणूनच कम्फर्ट झोनमधून वेळीच बाहेर पडणे आपल्याला शिकता आले पाहिजे.
कम्फर्ट झोनच्या बाहेर आपल्या स्वागताला उभा असतो फीअर (‘fear’)झोन. या झोनमध्ये ज्यांना जायचे नसते, त्यांच्याकडे असंख्य सबबी असतात. आपण नवीन झोनमध्ये टाकलेले पाऊल जर चुकीचे पडले, तर आपल्या अपयशावर इतर लोक हसतील अशी भीती त्यांच्या मनात घर करून बसलेली असते. ‘FEAR’एअफ मध्ये ‘F’ असतो ‘failure’, ‘E’ असतो ‘economic-loss’, ‘A’ असतो ‘agony’ म्हणजे दु:ख व ‘R’ म्हणजे ‘risk’. जेव्हा माणूस अनोळखी क्षेत्रात पाऊल ठेवतो, तेव्हा अपयशाची शक्यता अधिक असते.

आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील असतेच. नवीन वातावरणाशी किंवा लोकांशी जुळवून घेताना अपेक्षाभंगाचे दु:ख पदरात हमखास पडतेच. नवीन क्षेत्र म्हणजे जोखीम पत्करणे ओघाने येतेच. या सर्व नकारात्मक विचारांची वेस ओलांडणे अनेकांना शक्य होत नाही.

कधी कधी एखाद्या डोळस माणसाला अपघातामुळे अंधत्व येते. तेव्हा साहजिकच तो पार भेदरून जातो. डोळ्यांसमोर अंधार साचल्याने जगात वावरायचे कसे, याची भीती त्याला ग्रासून टाकते. पण, हळूहळू त्याला त्या अंधाराची सवय होते. डोळ्यांपुढे प्रकाश नसताना केवळ स्पर्श व पावलांनी मोजलेले अंतर यामुळे तो हळूहळू अंधारातही न चाचपडता वावरायला शिकतो. याचाच अर्थ त्याची वाटचाल फीअर झोन कडून ‘learning’ (लर्निग) झोनकडे होऊ लागते.

‘learning’ म्हणजे काय, तर ‘L’म्हणजे ‘likining’; नवीन वातावरणाची भीती न वाटता उलट त्याची आवड निर्माण झाली की, माणसामध्ये परत एकदा सहजता डोकावू लागते. नवीन वातावरणाचा बाऊ करण्यात अर्थ नाही, तर त्या वातावरणाशी मैत्री करण्यातच आपली भलाई आहे, हे जाणवू लागले की, ‘fear’ झोनचा परीघ कमी, तर ‘learning’ झोनचा परीघ वाढू लागतो. ‘E’ म्हणजे ‘experiment’; म्हणजे नवीन वातावरणात कसे वागावे, कसे बोलावे याबद्दल नवनवीन प्रयोग करण्याची चटक लागली की, अनोळखी, आव्हानात्मक वातावरणदेखील आपल्याला एक रंगमंच वाटू लागतो. ‘A’ म्हणजे ‘accustom’; याचा अर्थ नवीन अनोळखी मैदान आपल्याला आपले होम पीच आहे, असे वाटू लागणे. नवीन वातावरणाशी जुळवून घेताना जेव्हा आपण अनेक प्रयोग करतो, तेव्हा त्या वातावरणाचे रंग, मूड कधी व कसे बदलतात याचा आपल्याला हळूहळू अंदाज येऊ लागतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, नवीन वरिष्ठांशी कधी अदबीने वागण्याचा प्रयत्न केला, कधी डिप्लोमॅटिकली वागण्याचा प्रयोग केला, कधी लाळघोटेपणा करून पाहिला की, आपल्या बॉसला नेमके काय आवडते, काय आवडत नाही याचा अचूक ठोकताळा बांधता येतो व बॉसची भीती कमी वाटू लागते. ‘R’म्हणजे ‘routine’ नवीन वातावरणाशी मैत्री केली, त्यात राहून वेगवेगळे प्रयोग केले, त्या वातावरणाच्या प्रत्येक टोकदार कंगो-याची चांगली सवय झाली की, ते वातावरण आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होऊन जाते. ते काटय़ांसारखे टोचणारे, वेदना देणारे अनोळखी वातावरण आपल्याला मऊ, उबदार दुलईसारखे वाटू लागते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण घ्या. अंदमानच्या काळ्या अंधा-या कोठडीत जिथे काटे व खिळे होते त्या ठिकाणी एकलकोंडेपणाची पण भावना होतीच. या भयावह वातावरणाची भीती वाटणे साहजिकच, पण त्या थोर व्यक्तिमत्त्वाने या भीतीदायक क्लेशकारक वातावरणाशी मैत्री केली. त्या कोठडीच्या भिंतींवर काटय़ाखिळ्याने महाकाव्य लिहिण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जालीम इंग्रज जेलर त्यांचे भिंतीवरील लिखाण पुसून टाकतो याची जाणीव झाल्याने त्यांनी ते काव्य जेलर येण्याच्या आधी मुखोद्गत करण्याची सवय आपल्याला लावून घेतली. शेवटचा ‘N’ म्हणजे ‘नावीन्याचा ध्यास’ ‘learning’ झोन मधून ‘growth’ झोनमध्ये जायचे असेल, तर नेहमी नावीन्याचा ध्यास घेतलाच पाहिजे.
वैयक्तिक काय किंवा प्रोफेशनल जीवनात काय, चौथ्या झोनचे किंवा ग्रोथ झोनचे अनन्य साधारण महत्त्व असते. ‘growth’ मधील ‘G’ असतो तो ‘goals’ म्हणजे ध्येयासाठी; ध्येय डोळ्यासमोर असल्याखेरीज आयुष्यात ग्रोथ शक्यच नसते. ‘R’ म्हणजे ‘Re-think’. जुन्या मान्यता, रूढी यांचा फेरविचार करून त्यात समयानुसार बदल करणे हे सुदृढ वाढीचे एक वैशिष्टय़ आहे‘O’ म्हणजे ‘opportunity’; नेहमी संधीच्या शोधात राहणे हे वाढीसाठी आवश्यक असते, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘w’ म्हणजे ‘why’, ’what’, ‘where’.

जोपर्यंत आपण आपल्या मनाला प्रश्न विचारत नाही, जसे की – माझ्या जीवनाचा उद्देश काय (‘what’)?,मला आयुष्यात कोणत्या उंचीपर्यंत पोहोचायचे आहे, (‘where’)तोपर्यंत आपली वाटचाल ही दिशाहीन असते. ज्यावेळी हे प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हाच ग्रोथ ही प्रत्यक्षात साकारली जाते. ‘T’ म्हणजे ‘training’. मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या भूमिकेत राहिला, वेगवेगळे प्रशिक्षण घेत राहिला, तरच बौद्धिक व आर्थिक वाढ शक्य आहे. सर्वात शेवटी ‘H’ म्हणजे ‘health’, ‘happiness’ U ‘heart’;जर आपण हृदयाने विचार केला, लोकांच्या आनंदाचा विचार केला व सुदृढ, सकारात्मक विचार केला, तर लीडर किंवा नेता म्हणून आपली वाढ आपसूकच होते. यासाठी कम्फर्ट झोनपासून ग्रोथ झोनपर्यंतच्या प्रवासाची सुरुवात आवश्यक आहे.थोडे नवीन जरा जुने