मासिक पाळी संदर्भात समाज गैरसमज
आपल्या समाजामध्ये महिलांना येण-या मासिक पाळी संदर्भात कुणीही उघडपणे चर्चा करत नाहीत. मात्र, महिलांच्या याच मासिक पाळीबाबत सर्वात जास्त गैरसमज पसरविण्यात आलेले आहेत. केवळ धार्मिक रूढी-परंपरांच्या नावाखाली हे गैरसमज लहानपणापासून मुलींवर बिंबवले जातात. मात्र, या गैरसमजांवर विश्वास न ठेवता यासंदर्भात डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशाच काही गैरसमजांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

केस धुवू नयेत

नेहमी मुलींना सांगण्यात येते की, मासिक पाळी दरम्यान पहिले दोन दिवस केस धुवू नयेत. मात्र, असे काहीही नाहीये. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर लक्ष देण्याची गरज आहे. गरम पाण्याने आंघोळ केल्याने मासिक पाळीमुळे होणा-या त्रासापासून काहीप्रमाणात मुक्तता मिळू शकते.

मासिक पाळीदरम्यान सेक्स करू नये

मासिक पाळी आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस विकनेस जाणवतो त्यासाठी आराम करण्याची गरज असते. मात्र, मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्याने त्याचा आपल्या सेक्स लाईफवर वाईट परिणाम होतो हा केवळ गैरसमज आहे.

मासिक पाळीदरम्यान आंबट खाऊ नये

लहान मुलांना घाबरविण्यासाठी ज्याप्रमाणे म्हणतात ना की, जे सांगतोय ते ऐकलं नाही तर भुत पकडून नेईल. अगदी त्याच प्रमाणे हे सुद्धा आहे. कारण, मसालेदार जेवणानं पोट खराब होऊ शकतं पण मासिक पाळीमध्ये होणा-या वेदना आणि त्याचा काहीही संबंध नाहीये.

मासिक पाळीदरम्यान काम न करता आराम करावा

मासिक पाळीमध्ये शरीरातून रक्तस्त्राव होतो यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये. तसेच महिला आपलं दैनिक काम अगदी सहजपणे करू शकतात.


थोडे नवीन जरा जुने