सुखी जीवनासाठी काही टिप्स..
> इच्छा पूर्ण होत नसतील तर समजूतदार व्यक्तीने शोक करू नये. फक्त कर्म करत राहावेत.
> जो अधार्मिक काम करतो, निर्दोष लोकांना त्रास देतो, त्याचे आयुष्य, धन-संपत्ती, मान-सन्मान, पुण्य सर्वकाही नष्ट होते.
> एखाद्याविषयी मनात क्रोध पाळण्यापेक्षा तो क्रोध लगेच प्रकट करणे चांगले आहे, जसे की क्षणात जळून राख होणे उशिरापर्यंत जळत राहण्यापेक्षा चांगले आहे.
> अमृत आणि मृत्यू दोन्ही आपल्या शरीरात स्थित आहेत. मनुष्याला मोहापासून मृत्यू आणि सत्यापासून अमृताची प्राप्ती होते.
> इतरांसाठीही अशी इच्छा ठेवा जी तुम्ही स्वतःसाठी ठेवता.
> जो मनुष्य क्रोधीवर क्रोध न करता त्याला माफ करतो, तो स्वतःचे आणि क्रोध करणाऱ्या व्यक्तीचे महासंकटापासून रक्षण करतो. तो दोघांचेही रोग दूर करणारा चिकित्सक असतो.
> जेथे कृष्ण आहे तेथे धर्म आहे आणि जेथे धर्म आहे तेथे जय आहे.
> ज्या व्यक्तीच्या मनात संशय असतो त्याला या लोकात आणि परलोकातही सुख मिळत नाही.
थोडे नवीन जरा जुने