पोटाची किंवा गॅसची समस्येने त्रस्त आहात ? मग के करा फायदा होईलज्या लोकांची बाउल मुव्हमेंट अर्थात पोट साफ होण्याची प्रक्रिया नियमित होत नाही, त्यांचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीतच मलावरोध किंवा गॅसची समस्या निर्माण होते. घरगुती उपायांद्वारे बाउल मुव्हमेंट नियमित कशी करावी यासंदर्भात जाणून घेऊया.

सकाळी उठताच सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू आणि शेंदी मीठ मिसळून प्यावे. त्यामुळे बाउल मुव्हमेंट नियमित ठेवण्यास मदत होईल.


तज्ज्ञांच्या मते, फळांच्या ज्यूसमध्ये दूध मिसळून प्यायला हवे. तसेच ज्या फळांमध्ये गर असतो, त्यांचे थेट सेवन करा.


भोजनानंतर दालचिनी पावडरचे सेवन करा.


100 मि.लि. पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे थोडा वेळ उकळा आणि भोजन करण्याच्या एक तास आधी ते पाणी प्या. तसेच भोजनानंतर ते मेथीचे दाणे चावून खा.


दररोज सॅलडचे सेवन करायला हवे. त्यात पालक, टोमॅटो, मुळा आणि काकडीचा समावेश असावा. तसेच सर्व प्रकारच्या फळांपासून बनलेल्या सॅलडचेही सेवन करायला हवे.


दिवसभर भरपूर पाणी आणि ताक प्यायला हवे; जेणेकरून कडक शौचास होणार नाही. तसेच भाज्यांपासून बनलेले सूप व वरण यासारख्या द्रवपदार्थांच्या सेवनाचेही प्रमाण वाढवा.


तंतूमय फळे व भाज्यांचे सेवन केल्यासदेखील शौचास कडक होत नाही आणि पचन व्यवस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने