दुधाचे सेवन करण्याआधी या गोष्टींकडे लक्ष द्या




अनेकांना दूध पिणे आवडत नाही. अनेकांना तर दुध पाहुनच ओकारी येते. तर दुधावरच्‍या सायीची चव काहींना विचित्र वाटते. परंतु, या दुधामध्‍ये प्रचंड गुण आहेत. नियमित दुध पिणे आरोग्‍यासाठी चांगलेच असते.
दुध पृथ्वीवरील साक्षात अमृत आहे. हे सर्वोत्तम पेय तसेच खाद्यपदार्थांमध्ये संपूर्ण व सर्वश्रेष्ठ आहाराबरोबरच मौल्यवान औषधही आहे. मनुष्याची शारीरिक, मानसिक तसेच अध्यात्मिक शक्ती वाढवणारा दुधासारखा दुसरा आहार नाही.


परंतु दुधाचे सेवन करण्यापूर्वी पुढील गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या...

१) दुध जास्त वेळ तसेच तीव्र आचेवर गरम केल्याने त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते.


२) फिके दुध पिणे अधिक लाभदायक असते. दुधात साखर मिसळल्याने शरीरातील कॅल्शिआमचे प्रमाण कमी होते आणि कफाचे प्रमाण वाढते.


३) दुधात गूळ मिसळून कधीही पिऊ नये, यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते.

४) दमा, जुलाब, मुरडा, पोटदुखी, अपचन, नवा ताप, त्वचाविकार इ. व्याधींमध्ये दुध पिऊ नये.


५) आंबट व खारट पदार्थ तसेच मांसाहारी जेवणाबरोबर दुधाचे सेवन करू नये. यामुळे असंख्य रोग उद्भवतात.


६) जेवण आणि दुग्धपान यात कमीतकमी दोन तासांचे अंतर आवश्य असले पाहिजे.


7) उडदाच्या डाळीसोबत दुधाचे सेवन करू नये. कारण हे आरोग्यासाठी चांगले नाही.



थोडे नवीन जरा जुने