गरोदरपणात पायाच्या समस्या निर्माण होतात म्हणून अशी घ्या काळजी
गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं. त्यामुळे त्यांच्या वजनाचा भार हा त्यांच्या पायावर पडत असतो. म्हणूनच या दरम्यान पायाच्या समस्या निर्माण होतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. आजकाल गरोदरपणात पायातली शक्ती कमी होणे, दुखणे, जड वाटणे किंवा खेचल्यासारखे होणे अशा समस्या निर्माण होतात. कित्येक स्त्रियांना तर रात्री झोपण्यापूर्वी पाया आखडणे किंवा दुखणे अशा समस्या निर्माण होतात. गर्भावस्थेच्या सुरुवातीलाच काही महिलांचुा पायावर सूज यायला सुरुवात होते.


सकाळी झोपून उठल्यावर कमी होते आणि संध्याकाळी अधिक असते. यामुळे कित्येक वेळा मांडीवर निळळ्या नलिकांचं जाणंही स्पष्ट दिसतं. कधी कधी तर शिरांमध्ये रक्त जमा होतं तर कधी कधी नलिका मोठया होऊन व्हेरीकोस व्हेन्सचा त्रासही होऊ शकतो. अशा कोणत्याही समस्या बाळ आणि आईसाठी भयंकर ठरू शकतात.


याची कारणं काय आहेत?

बराच वेळ खुर्चीवर बसून पाय लोंबकळत ठेवणे किंवा कित्येक तास उभं राहणे

अनुवंशिक कारणांमुळेही ही समस्या गर्भवती महिलांमध्ये आढळते.

रक्ताभिसरणाचा अर्थ शुद्ध रक्त शरीराच्या इतर भागाला पुरवणे असा असतो. नको असलेलं अशुद्ध रक्त बाहेर फेकलं जातं. प्रत्येक ठोक्याला हृदय रक्त पाठवत असतं. ही अशूद्ध रक्त घेऊन शुद्ध रक्त पाठवण्याची प्रक्रिया सतत सुरु असते. मात्र ही प्रक्रिया कमी झाली तर त्याचा परिणाम आई आणि बाळावर होऊ शकतो. म्हणूनच गर्भवती स्त्रियांच्या पायांमध्ये अधिक वेळ अशुद्ध रक्त साचू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कसा उपाय कराल?

या अवस्थेत नियमित फिरणं आवश्यक आहे त्याचप्रामणे पायाचा हलका-फुलका व्यायामही करणं आवश्यक आहे.

वर सांगितलेल्यापैकी कोणतंही लक्ष आढळल्यास त्वरीत डॉक्टरांकडे धाव घ्यावी. दोन महिन्यांनी आपल्या पायांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

आपल्या पायांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही याची गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण या समस्या निर्माण झाल्यावर त्यांना कित्येक प्रकारच्या गोळळ्या घ्याव्या लागतात ज्या त्यांच्यासाठी नुकसानकारक आहेत.

एक तासापेक्षा अधिक वेळ उभं राहणं टाळावं. तसंच कित्येक वेळ पाय लोंबकळून ठेवून बसू नये. त्याचप्रमाणे कडक कडा असलेल्या खुच्र्याचा वापर कमी करावा.

ऑफिसला जाणा-या महिलांनी आपल्या कामाच्या दरम्यान अधून मधून पायाना व्यायाम द्यावा. सतत खुर्चीवर बसण्याऐवजी अधूम मधून फिरावं.

थंडीच्या दिवसांत खूप गरम पाण्याचा वापर करू नका. तसंच खूप वेळ उन्हात बसू नका. पायाच्या शिरा उन्हात बसल्याने प्रसरण पावतात. आणि त्या ठिकाणी खराब रक्त जमा व्हायला सुरुवात होते.

खूप दमल्यास पायांवर थंड पाणी टाकावं. आणि रात्री झोपताना पायाखाली लोड किंवा उशी घेऊन झोपावं.

शक्य असल्यास पायांना आराम देण्यासाठी स्टॉकिंग्ज घालावेत.

पायांना अचानक सूज आल्यास चोवीस तासाच्या आत त्वरीत डॉक्टरांकडे संपर्क साधावा.
थोडे नवीन जरा जुने