अशा प्रकारे घ्या दातांची काळजी...


दात हा चेहर्यावरील असा भाग आहे की, ज्यामुळे आपल्या सौंदर्यात अमूल्य भर पडते. रोज सकाळी उठल्यावर ब्रश करणे, यापलीकडे आपल्याकडून दातांची विशेष अशी काळजी घेतली जात नाही. मग कधीतरी दात दुखू लागतो, तेव्हा ’सुरुवातीपासूनच काळजी घेतली असती तर बरं झालं असते,’ असे वाटू लागते. त्यामुळे दातांच्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. त्यामुळे दातांची काळजी घ्यायलाच हवी.
दात दुखत असेल किंवा सूज आली तर दुर्लक्ष करू नका.

 दात किडला असेल तर वेळीच उपचार करून घ्यावेत.


 डेंटल फॉल्स, टूथपिक, टंग क्लीनर, माउथवॉश आदींचा दंततज्ज्ञांच्या सल्ल्याने उपयोग केल्यास दात मजबूत राहतात.पान-तंबाखू तसेच गुटख्याचे सेवन टाळा. धूम्रपानाची सवयही कमी करा. या सवयी सोडल्या तर चांगल्या.काहीही खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरावी.शक्य झाल्यास कमी शिजलेले अन्नपदार्थ खावेत. त्याने अन्न चावण्याची क्रिया वेगाने होऊन दातांचे आरोग्य सुधारते.

अति शिजलेले अन्नपदार्थ, चॉकलेट, आइस्क्रिम, जंक फूड टाळावेत. दातांसाठी ताजी फळे खाणे कधीही चांगले. त्यातही सफरचंद हे फळ दातांच्या मजबुतीसाठी चांगलं समजले जाते. दंततज्ज्ञ सफरचंदाला नैसर्गिक टूथब्रश म्हणतात. कारण सफरचंद खाल्ल्याने हिरड्यांची कार्यक्षमता वाढते. अधिकाधिक लाळ स्रवते दातांची कीड वाढण्यास आळा बसतो. तोंड कोरडे पडल्यास दात खराब होण्याची शक्यता अधिक असते.


आहारात गाजर, ताजी फळं, शेंगदाणे, लो फॅट दही, चीज, तंतुमय भाज्यांचा समावेश असावा, यांनीही दातांचे आरोग्य सुधारते. ज्या आहारात पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक आहे, असा आहार टाळल्यास उत्तम. दातांच्या मजबुतीसाठी चांगले. दिवसातून दोनदा दात घासा. म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी. दात घासताना ते गोलाकारपद्धतीने घासले पाहिजेत. तसेच हिरडयांवरूनही हलकेच ब्रश फिरवावा.

Take care of your teeth this way
थोडे नवीन जरा जुने