प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, असा घ्या ख-या प्रेमाचा शोध
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मंगेश पाडगांवकरांच्या या ओळी ऐकल्या नाही असा माणुस सापडणं कठीणच. प्रेम खरच सगळयांचं सारखच तर असतं ज्याला आयुष्यात खरं प्रेम मिळतं तो खरा भाग्यवंत. निरपेक्ष पे्रम करणारी माणसं आपल्या अवतीभवती असतील तर जगायला आणखीन काय हवं ? त्यामुळे पैसा वापरायला शिका आणि माणसं जपायला शिका.
प्रेम विश्वातील सगळयात सुंदर शब्द. ज्याला मिळालं त्याचं जीवन स्वर्ग बनुन जातं. जर तुम्ही ख-या प्रेमाच्या शोधात आहात आणि तुम्हाला फक्त समस्याच नशीबात येत आहेत आणि उथळ नातेसंबंधच आजुबाजुला पहायला मिळतायेत तर इथं आम्ही तुम्हाला खरं प्रेम शोधायला मदत करतील अश्या काही टिप्स् काही उपाय सांगत आहोत. या जगात करोडो लोक असे पाहायला मिळतील जे परफेक्ट जीवनसाथीच्या शोधात आहेत पण या शोधादरम्यान तुम्हाला कठीण परिश्रम करण्याची आवश्यकता आहे? खरतरं आज खरं पे्रम शोधणं म्हणजे तांदुळातुन साखरेचा दाणा शोधण्याइतकं कठीण आहे. पण तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही खरं प्रेम शोधण्याचे दहा चांगले उपाय आम्ही इथे देत आहोत

तुम्ही सगळयात चांगले बना

जरी हे मान्य केलं की समोरच्याला आकर्षीत करायचं आहे पण सगळयात महत्वाचं हे लक्षात घ्यायला हवं की आवडच पसंतीला आकर्षीत करते. तुम्ही ज्याच्यासोबत आपलं संपुर्ण आयुष्य व्यतीत करू ईच्छीता त्याच्या प्रती तुम्हाला तुमच्या मेंदुत बुध्दी विकसीत करावी लागेल. जर सुस्त, खाउ, कंजुस आणि राहणीमान घाणेरडं असलेल्या व्यक्तीला जीवनसाथी बनवु ईच्छीत नसाल तर सर्वात आधी तुम्हाला स्वतः स्वच्छ राहण्याची आवड निर्माण करायला हवी.

तुमचे अतित विसरा

खरे प्रेम शोधण्याचा हा सर्वात महत्वाचा उपाय आहे. जर तुम्ही तुमच्या नात्यात भुतकाळाचं ओझं घेउन प्रवास करता आहात तर याचा परिणाम वर्तमानातील नात्यांवर नक्की पडेल म्हणुन तुम्हाला तुमच्या भुतकाळाला विसरायला हवं. जुन्या गोष्टी विसरून माणसांना तुमच्या जवळ तुम्हाला येउ दयावं लागेल. तेव्हांच तुम्ही तुमच्या ख-या प्रेमाला शोधु शकाल.

जास्त आतातायीपणा करू नका

तुम्ही अश्या व्यक्तीच्या शोधात आहात जो तुम्ही करत असलेल्या कार्यात अडथळा ठरेल ? कधीही नाती जोडतांना आपला पुर्ण वेळ घ्या, केव्हांही कोणत्याही व्यक्तीला असं वाटु देउ नका की घाई घाईत तो चुकीचा निर्णय घेतो आहे. नाती जोडतांना हळुहळु गोष्टींवर विश्वास ठेवा आणि एकदुस-यांना समजण्याकरता लागणारा वेळ घ्या. या नंतर जर तुम्ही एकमेकांकरता योग्य असाल तर तुम्ही सहजच आपोआप एकमेकांजवळ याल. जर तुम्ही खरे प्रेम शोधत आहात तर तुम्ही कुणालाही आपल्यावर प्रेम करण्याकरता बाध्य करू शकत नाही.

स्वतःच्या शारीरीक हालचाली नियंत्रीत ठेवा

नेहमी असं बघायला मिळतं की ख-या प्रेमाच्या शोधात असतांना जेव्हा तुम्ही कुणाबरोबर डेट वर जाता तेव्हा तुम्ही बैचेन असल्याने तुमच्या शारीरीक हालचाली तुमच्या नियंत्रणात नसतात त्यामुळे नेहमी या गोष्टीची काळजी घ्या की तुमचे हावभाव तुमच्याबद्दल समोरच्याला काय सांगतायेत. तुम्ही तुमच्या हातांची घडी घातली आहे, किंवा तुमचे खांदे आक्रसलेले आहेत ? तर रिलॅक्स व्हा आणि शरीराला मोकळे करा यामुळे तुमच्यातील स्मार्टनेस खुलुन बाहेर येईल ज्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला आकर्षीत करू शकाल.

वास्तवात राहा

ख-या प्रेमाचा शोध घेण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. कधीही कोणत्या मुलाला आपल्या कामांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त आपल्या वास्तवीक रूपात आहात तसे राहा तुम्हाला या गोष्टीची चिंता नक्कीच वाटू शकते तुमच्या ख-या रूपाला पाहुन तो तुमच्यापासुन दुर निघुन गेला तर? पण या उपायाने असे कधीच होणार नाही. कारण तुम्ही अश्या व्यक्तीवर प्रेम करता जो तुमच्यावर तुम्ही जशे आहात तसच तुमच्यावर पे्रम करतो तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत नाही. जर तुम्ही तुमच्या वास्तवाला धरून वागणुक करणार नाही तर समोरच्याला लगेच समजुन जाईल की तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करता आहात.

कधीही कुणाबद्दल मत बनवण्याची घाई करू नका

जोपर्यंत एखादया मुलाबद्दल तुम्ही पुर्णपणे माहीती करून घेत नाही तोवर त्याला तुमची काळजी नाही म्हणुन त्याला लिस्ट मधुन काढु नका कारण तुम्ही लोकांमध्ये असे गुण शोधायला जाता जे तुमच्यात आहेत पण तुमची ही अपेक्षा करणं चुकीचं आहे की तुमच्या लिस्ट मधले सगळे आदर्श गुण समोरच्यात असावेत. जोपर्यंत तुम्ही 100 टक्के एखादया माणसाला ओळखत नाही तोपर्यंत निर्णय घेउ नका, आपल्या डोक्यात त्याची प्रतिमा तयार करण्यापुर्वी 2 ते 3 वेळेला त्याला स्वतःला सिध्द करण्याची संधी दया.

बाहेर पडुन प्रेमाचा शोध घ्या

तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या राजकुमाराचा शोध घरबसल्या सोफ्यावर बसुन टि व्ही पाहात कधीच घेउ शकणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या राजकुमाराला जर तुमचा जोडीदार बनवायचं असेल तर तुम्हाला त्याला भेटावं लागेल आणि तो तुम्हाला तेव्हांच भेटेल जेव्हां तुम्ही घराबाहेर पडाल, पाटर्यांमधे जावे लागेल, डेटिंग साइट्स् चं सदस्य व्हावं लागेल आणि त्या सगळया मित्रांना भेटावं लागेल जे ख-या प्रेमाच्या शोधात आहेत. कारण तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला तुमचा मिस्टर परफेक्ट कुठे भेटेल. पण जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तुमचा मिस्टर राईट नक्की भेटेल.

पुरूषांसोबत नेहमी मोकळेपणाने आणि प्रामाणिक राहा

नात्यांमधे बांधले गेल्यानंतर तुमचं काम केवळ पुरूषाला खुश ठेवणेच नसतं. जर कधी तुम्हाला असं वाटेल की तुमचा जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करतो आहे तर लगेच त्याला सांगा. नात्यांमधे कधी ही आपले मत सांगायला समोर मांडायला लाजु नका. प्रेम केल्यानंतर नेहमी एकमेकांप्रती प्रामाणीक राहा आणि एकमेकांप्रती प्रामाणिक राहा आणि एकदुस-याच्या विचारांचा आदर करा.

खरं प्रेम शोधणच केवळ तुमची प्राथमिकता आहे असे समजु नका

असं कधीही वाटु देउ नका की खरं प्रेम शोधणच तुमच्या जीवनाचं लक्ष्य आहे. कारण नातेसंबधांत राहाणच महत्वाचं नाही. तुम्हाला पुर्णपणे परफेक्ट बनावेच लागेल. प्रेमात असतांना तुम्ही ज्या डेटस् वर जाल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. ज्याला तुम्ही डेट करत आहात त्याच्या बाबतीत किंवा त्याच्या स्वभावाबद्दल थोडीफार माहीती नक्की मिळवा.

वर्तमानाचा आनंद घ्या भविष्य आनंदीत होईल

खरं प्रेम शोधण्याचा शेवटचा आणि सोपा उपाय – वर्तमानाचा आनंद घ्या भविष्य आनंदीत होईल. जेव्हां तुम्ही डेट वर जाता तेव्हां तुमच्या मनात एकच चिंता असते, ’’ त्याला मी पसंत आहे?’’ किंवा ’’ तो मला पुन्हा डेट वर येण्याकरता विचारेल?’’ स्त्रियांची सगळयात प्रेमळ गोष्ट म्हणजे त्यांचं हास्य, म्हणुन डेट वर जातांना हसायला विसरू नका आणि आपल्या भुतकाळाविषयी किंवा सगळया चिंता विसरून फक्त डेट चा आनंद घ्या आणि आपले भविष्य बनवा.

थोडे नवीन जरा जुने