चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय !


वाढत्या वयासोबत चेहर्‍यावर सुरकुत्या येतात, परंतु कधीकधी अवेळी सुरकुत्या येण्याची शक्यता असते. त्वचेची तन्यता कायम राहण्यासाठी कोलेजन हा घटक महत्त्वाचा असतो. याच्या कमतरतेमुळे शरीरावर सुरकुत्या पडायला लागतात. कोलेजन हा त्वचेबरोबर हाडे, स्नायू, कार्टिलेज आणि अंतर्गत अंग, दात या ऊतींना मजबूत करण्यासाठी गरजेचा असतो.

काय आहे कोलेजन ?

कोलेजन एक प्रकारचे प्रोटीन आहे. जे त्वचेच्या तीन स्तरांपैकी सर्वात खालच्या स्तरात आढळतो. हे अणूंप्रमाणे एकमेकांत गुंफून राहत पूर्ण त्वचेवर पसरलेले असतात. कोलेजननिर्मिती फाइब्रोब्लास्ट नावाच्या पेशीपासून होते. जे त्वचेच्या आतल्या डर्मिस पातळीवर असते. हा रक्तवाहिका, पाचनतंत्र, हृदय, जठर, मूत्रपिंड आणि आतड्यांना आपल्या जागेवर राहण्यासाठी मदत करणारा घटक आहे.

व्हिटॅमिन ‘सी’ गरजेचे -

कोलेजनला नैसर्गिकरीत्या सक्षम ठेवण्यासाठी आणि फ्री रेडिकल्समुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी व्हिटॅमिन सी फार गरजेचे आहे. याच्या कमतरतेमुळे त्वचा कोलेजननिर्मिती करणे थांबवते. कोलेजनचा स्तर टिकवण्यासाठी सर्व आंबट फळे आणि पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत.

जास्त वेळ उन्हात राहणे, शरीरात फ्री रॅडिकल्सची निर्मिती होणे आणि दूषित वातावरणातील विषारी घटकांमुळे कोलेजनचे नुकसान होते.

फॅटयुक्त खाद्यपदार्थांचे अतिसेवन आणि धूम्रपान, दारू अशा वाईट सवयींमुळे कोलेजनला धोका पोहोचतो. आर्थरायटिससारखे आजार किंवा त्वचा संक्रमणामुळेही कोलेजन तुटण्याची प्रक्रिया सुरू होते.

तीव्र आगीच्या संपर्कात आल्यामुळेदेखील कोलेजनला हानी पोहोचते.

Take these measures to reduce facial tingling
थोडे नवीन जरा जुने