मिटिंगला जात असताना घ्या 'ही' काळजी !


उद्योग आणि व्यवसायात मिटिंगला मोठं महत्त्व आहे. अनेक मोठे प्लानिंग आणि डिल ही या मिटिंगमध्ये केली जाते. असं म्हणतात की फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन, मात्र बरेचदा केवळ छोट्या छोट्या चुका तुमचं मोठं नुकसान करू शकते. मिटिंग कुणासोबतही असो मग ती एखाद्या ग्राहकासोबत असो किंवा बॉस सोबत, तुम्ही जर काही नियम पाळले तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो.

 व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा विशेष पैलू म्हणजे वेळ पाळणे. कोणत्याही मिटिंगसाठी वेळेत जा. यामुळे तुमचा प्रामाणिकपणा लक्षात येईल.

स्वत:चा परिचय द्या: स्वत:चा परिचय देणे हा बिझनेस मिटिंगचा पहिला शिष्टाचार आहे. एकमेकांचा परिचय नसेल तर आधी परिचय करायला हवा.

मिटिंगला जाण्यापूर्वी ती कशाशी संबंधित आहे हे जाणून घ्या. संपूर्ण अभ्यास करून तयारी करा. पूर्वतयारी न करता मिटिंगमध्ये सहभागी होणे योग्य नाही.

मिटिंगमध्ये असताना नीट बसा. मिटिंग रूममध्येही काही लोक आळश्यासारखे बसतात. असे बसणे योग्य दिसत नाही. नीट बसून नीट वागा.

फोन पाकिटात ठेवल्यास जास्त चांगले. अनेकजण टेबलवर फोन ठेवतात. मिटिंगदरम्यान फोन वाजल्यास ते शांतताभंग करणारे ठरते. फोन सायलेंट मोडवर ठेवा आणि फोन उचलणे खूपच आवश्यक असेल तर मिटिंग

रूममधून बाहेर येऊन फोन उचला.
आवश्यक असेल तेव्हा योग्य वेळी प्रश्न विचारा. निर्थक प्रश्न विचारू नका. तसेच मिटिंग संपायच्या वेळी प्रश्न विचारू नका.

Take 'this' care when going to a meeting
थोडे नवीन जरा जुने