दिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा घेतल्यास शरीरात होतील "हे" बदल


कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्यापासून फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. याविषयी झालेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की, दररोज 3 कपांपेक्षा जास्त चहा आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो.
टी बॅग्समध्ये खूप जास्त प्रमाणात प्लूरॉइड असतं आणि ते दातांसाठी, हाडांसाठी हानीकारक ठरू शकतं.

तर संशोधनातून असे सुद्धा लक्षात आले आहे की, प्लूरॉइडच्या अति सेवनामुळे फ्लूरोसिस नावाचा आजार देखील होऊ शकतो.


यामुळे दातांच्या वरच्या स्तराला हानी पोहचते. ही समस्या कमी दर्जा असलेल्या चहामुळे जास्त होऊ शकते.


चांगल्या दर्जाचा चहा जरी जास्त किमतीचा असला तरी तोच घेणे केव्हाही हितावह ठरते कारण उत्तम दर्जा असलेल्या चहामध्ये प्लूरॉइडचे प्रमाण नियंत्रित असतं.


संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, स्वस्त / कमी दर्जा असलेल्या चहामध्ये फ्लूरॉइडचे प्रमाण सहा पटीने जास्त असते.


स्वस्त चहा हा एक वर्ष जुने झालेल्या चहाच्या पानांपासून बनवला जातो. त्यामुळे त्यात मिनरलचे प्रमाण जास्त असते.


फ्लूरॉइडमधून स्केलेटल फ्लूरोसिसची शक्यता वाढते. त्यामुळे सांध्यांमध्ये कॅल्शियम साठू लागते. परिणामी सांधे आखडतात.


विश्व स्वास्थ संघटनेने सुद्धा रोज सहा मिलिग्रॅम म्हणजेच चार कपांपेक्षा जास्त चहा प्याल्यास आरोग्यास धोका संभवण्याची शक्यता वर्तवली आहे.

Taking more than three cups of tea a day will result in "these" changes in the body
थोडे नवीन जरा जुने