ही कॉफी घेतल्यास मृत्यूचा धोका 16 टक्क्यांनी होतो कमी
कॉफी आरोग्यासाठी चांगली की वाईट याविषयी वाद आहे, परंतु जर मर्यादित प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास ते फायदेशीर ठरते, असे बहुतांश जाणकारांचे यावर एकमत आहे.
कॉफी विषयी विशेष माहिती -

कॉफी पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते, असे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. तुम्ही जर नियमित आणि नियंत्रित स्वरूपात कॉफीचे सेवन केले तर हे आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. एका संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की दररोज कॉफीचे घोट घेणार्‍यांचा मृत्यूचा धोका 16 टक्क्यांनी कमी होतो.


तणाव होईल दूर

आर्काइव्स ऑफ इंटरनल मेडिसिनच्या संशोधनानुसार एका दिवसात 3 कप कॉफी पिल्याने व्यक्तीच्या तणावाचा धोका 15 टक्क्यांनी कमी होतो, तर एका दिवसात 4 कप कॉफी पिल्याने हा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो.
पित्त खड्यापासून रक्षण
हॉर्वर्ड विद्यापीठातील संशोधकांना प्रयोगात असे दिसले की ज्या व्यक्ती दररोज चार कप कॉफी पितात त्यांना गालस्टोन ( पित्तखडे) होण्याचा धोका कमी होतो.


वाढेल स्मरणशक्ती
दररोज दोन कप कॉफी पिल्याने शॉर्ट टर्म मेमरी आणि लाँग टर्म मेमरीला वाढवता येते. रेजिओलॉजिकल सोसायटी ऑफ नार्थ अमेरिकेच्या एका संशोधनात असे आढळले की दिवसा कमीत कमी दोन कप कॉफी पिणार्‍यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते. अशा व्यक्ती तत्काळ निर्णय घेण्यास सक्षम असतात.


मधुमेहाचा धोका कमी
दररोज विनासाखरेचे चार कप कॉफी पिण्याची सवय तुम्हाला मधुमेहापासून रोखू शकते. जर्नल ऑफ अँग्रिकल्चर अँड फूड कॅमेस्टीमध्ये प्रकाशित संशोधनानुसार दररोज कॉफी पिणार्‍या व्यक्तींना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका 55 टक्क्यांपर्यंत कमी होतो.


पार्किसनची भीती नाही:
जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या संशोधनानुसार दररोज दोन कप पिल्याने पार्किसनचा धोका 25 टक्क्यांनी कमी होतो. या संशोधनात 3500 महिला आणि पुरुषांना सामील करून घेण्यात आले होते.


कॅन्सरपासून बचाव:
दररोज कॉफी पिण्याची सवय कॅन्सरच्या धोक्याला पाच टक्क्यांनी कमी करते. ब्रेस्ट कॅन्सर रिसर्चमध्ये प्रकाशित संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. या शोधानुसार दररोज पाच कप कॉफी पिल्याने स्तनकॅन्सरचा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो.


थोडे नवीन जरा जुने