हिवाळ्यात सकाळी सकाळी हा प्रयोग करा चेहरा तरुण आणि तजेलदार दिसेल !


स्वस्थ आणि सुंदर राहणं कोणाला आवडत नाही; परंतु औषध आणि ब्युटी प्रॉडक्ट्स वापरल्यानं अनेकदा साइड इफेक्ट्सला सामोरं जावं लागतं. अशात घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत वाफ घेण्याचे फायदे. घरात काळजीपूर्वक स्टीम घेतल्यानं खर्चदेखील वाचतो आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.

वाफ घेतल्यानं ताण कमी होतो. तसंच वाफ घेतल्यानं चेहऱ्यावरील त्वचेच्या रक्त परिसंचरणात सुधार होतो आणि पेशींमध्ये रक्तप्रवाह वाढतो. अशानं त्वचेला पोषक तत्त्व आणि ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळतं आणि त्वचा तरुण दिसू लागते.

त्वचेवरील डेड स्किन स्वच्छ करण्यासाठी आणि नैसर्गिकरीत्या त्वचा चमकदार व्हावी यासाठी वाफ घेणं एक योग्य उपाय आहे. यामुळे कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट्स न वापरता आपण ग्लोइंग स्किन मिळवू शकता.

चेह‍ऱ्यावर वाफ घेतल्यानं त्वचेत आढळणारे टॉक्सिन हटण्यास मदत मिळते. केवळ चेह‍ऱ्यावरील वाफेनेदेखील शरीरात विषाक्त पदार्थांपासून मुक्ती मिळू शकते.

चेह‍ऱ्यावरील मृत त्वचा हटविण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी वाफ घ्यावी. यामुळे त्वचा ताजीतवानी दिसते आणि त्वचेवरील ओलावादेखील कायम राहण्यास मदत मिळते. ड्राय स्किन असणा‍ऱ्यांसाठी वाफ घेणं फायदेशीर ठरेल.

चेहऱ्यावर मुरूम असल्यास वाफ घेतल्यानं छिद्रांमध्ये जमा असलेली घाण, बॅक्टेरिया सहज बाहेर निघतात आणि त्वचा स्वच्छ दिसू लागते.

सर्वांत आधी सुविधापूर्ण जागेची निवड करा. यासाठी टेबल योग्य पर्याय आहे. यासाठी आपल्याला एका टॉवेलची गरज असेल. वाफ घेण्यापूर्वी आ‍पले केस बांधून घ्यावे. वाफ घेण्यापूर्वी चेहरा आणि मान स्वच्छ करून घ्यावी. नंतर एका भांड्यात चार-पाच ग्लास पाणी उकळून घ्या. गॅसवर वाफ घेण्याची चूक करू नका. भांड्यापासून ६ ते ८ इंच लांबीवर चेहरा ठेवा.


थोडे नवीन जरा जुने