बटाट्याच्या भाजी मध्ये आहे हे औषधी गुण या आजारांपासून मिळेल मुक्ती
जगभरात सर्वत्र आढळणारी, जास्त वापरली जाणारी भाजी म्हणजे बटाटा. बालकांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांच्या आवडीची अशीही भाजी. सर्वांच्या आवडीचे कारण म्हणजे चविष्ट आणि पौष्टिकपणा.
एका साधारण आकाराच्या बटाट्यात 110 कॅलरी असतात. फॅट, कोलेस्टेरॉल आणि सोडियम अजिबात नसते. असे असले तरी बहुतांश लोक बटाट्याला फक्त चव वाढवण्याचे एक साधन समजतात, पण ही बहुगुणी अशी भाजी आहे. यात असे अनेक गुण आहेत जे व्यक्तींना आजारापासून वाचवतात.

काय आहेत गुण
पोटॅशियम :
बटाटा पोटॅशियमचा चांगला स्रोत असून यात केळ्यापेक्षा जास्त प्रमाणात पोटॅशियम आढळते. एका मध्यम आकाराच्या बटाट्यातून(सालीसह) दररोजची 18 टक्के पोटॅशियमची गरज भागवली जाते.
फायदा : पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो.


व्हिटॅमिन सी :
बटाट्यात दररोजच्या गरजेपैकी 45 टक्के व्हिटॅमिन्स सी आढळते. एवढे व्हिटॅमिन सी एक साधारण आकाराच्या टोमॅटोमध्ये आढळते.
फायदा :
व्हिटॅमिन सी जखम लवकर बरी होण्यासाठी उपयुक्त असतो. हिरड्या देखील मजबूत ठेवतो.


फायबर :
एका बटाट्यात 8 टक्के फायबर असते.
फायदा : संशोधनानुसार हा फायबर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी महत्त्वाचा असतो.


लोह :
एका बटाट्यात रोजच्या गरजेपैकी 8 टक्के लोह आढळते.
फायदा : रक्त वाढण्यात उपयोगी
आरोग्यासाठी फायदेशीर
वजन वाढवतो :
ज्या व्यक्तींना आपले वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी बटाटा हा एक चांगला पदार्थ आहे. यात मुबलक प्रमाणात काबरेहायड्रेट्स असतात. जे वजन वाढवण्यात मदत करतात.
पचनास हलके :
काबरेहायड्रेट्स जास्त असल्याकारणाने झटपट पचते.


मेंदूची कार्यक्षमता वाढते : मेंदूचे कार्य योग्य पद्धती, जलद होण्यासाठी योग्य प्रमाणात ग्लुकोज, ऑक्सीजन आणि व्हिटॅमिन्स बीची गरज असते. बटाट्यातून या गोष्टींची पूर्तता होते.


अँसिडिटीपासून सुटका : पोटातील आग कमी करण्यासाठी बटाटा अत्यंत उपयुक्त असतो. यात असणारे अँटीऑक्सीडंट्स आतडे आणि पचन प्रणालीतील आग कमी करतात.
थोडे नवीन जरा जुने