विमानाचा रंग पांढरा असण्यामागे 'हे' आहे कारण...


लंडन: प्रत्येकाचं आयुष्यात एकदा तरी विमानानं प्रवास करायचं स्वप्न असतं. अनेकांचं हे स्वप्न पूर्ण देखील होतं. पण हा प्रवास करताना आपण कधी विचार करत नाही की अधिकाधिक विमानाचा रंग नेहमी पांढरा का असतो. विमानाला रंग नसतो असो काही नाही. अशा कलरफुल विमानांची संख्या खूप कमी आहे. अधिकाधिक विमानाचा रंग हा पांढराच दिसून येतो. यामागे काही कारणं आहेत.

पांढरा रंग हा थंड असतो. त्यामुळे विमानाला थंड ठेवण्यासाठी पांढर्‍या रंगाचा वापर करण्यात येतो. त्यामुळेच इतर रंगांपेक्षा हा रंग विमानाला लावल्यास कमी उकडते. एका विमानाला रंग लावण्यासाठी जवळपास ३ लाखांपासून ते १ कोटीपर्यंत खर्च येतो आणि कोणतीही कंपनी एका विमानाच्या रंगामागे इतकाखर्च करणे पसंत करत नाही. त्याचसोबत एका विमानाला रंग लावण्यासाठी ३ ते ४ आठवडे इतका कालावधी लागतो. त्यामुळे कंपनीचे खूप नुकसान होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून सफेद रंगच ठेवला जातो.

दररोज विमान उन्हामध्ये उभे असल्यास त्याच्यावर लावलेले इतर रंग फिकट होतात. मात्र पांढर्‍या रंगासोबत अशी समस्या निर्माण होत नाही. त्यामुळेच जास्तीत-जास्त विमान कंपन्या विमानाला पांढरा रंगच ठेवणे पसंत करतात. तसेच विमानाचा रंग पांढरा ठेवण्याचे एकमेव कारण म्हणजे कंपनी विमान खरेदी करते आणि विकत असते. अशावेळी जर पांढरा रंग असेल, तर कंपनीचे नाव लवकर बदलता येते. कोणताही दुसरा रंग लावल्यास विमानाचे वजन वाढते. त्यामुळे पेट्रोल जास्त लागतो. पांढर्‍या रंगामुळे पेट्रोल कमी लागतो आणि कंपनीला विमान उडवणे परवडते. त्या सर्व कारणांमुळे विमानाचा रंग नेहमी पांढराच ठेवला जातो.

The reason for this is because the aircraft color is white
थोडे नवीन जरा जुने