अरेंज मॅरेजमध्ये मुली मुलांना नाकारतात ही आहेत त्याची कारणे...
1) चाळीत राहणाऱ्या मुलाची स्थळ नकोच असा मजकूर मुली आपल्या मॅरेजच्या रिझ्युममध्ये सर्वात प्रथम टाकतात. स्वतः चाळीत राहणाऱ्या मुली चाळीतच राहणाऱ्या मुलांची स्थळ नाकारत आहेत. त्यामुळे चाळीतल्या मुलांची लग्न होण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

2) एकत्र कुटूंब पद्धत तर आता लोप पावत चालली आहे. पण आता वनरूम किचनमध्ये आई-वडिलांसोबत राहणाऱ्या मुलांना मुली लग्नानंतर वेगळं राहण्याचा पर्याय सुचवतात. अथवा नकार देऊन विषयच संपवून टाकतात. आई – वडिलांसोबत राहण्यास नकार दिला जातो.

3)मुंबईत घरं विकत घेणं आता कठिण होत चाललं आहे. एकाच्या पगारात विरार, अंबरनाथ, ठिकाणी घर घेणं शक्य असलं तरी ते प्रवासाच्या दृष्टीकोनातून अशक्य होत चाललं आहे. मुंबईत स्वतःचं घर नसल्यामुळे मुली देतात निकार

4) पगार कमी असल्यास नकार देतात. आताची महागाई पाहता मुली लग्न करताना मुलाच्या पगाराला पहिलं प्राधान्य देतात. त्यामुळे २० हजारापर्यंत पगार असलेल्या मुलांना मुली लगेच नकार देतात. कमीत कमी मुलाचा पगार ४० हजार असावा असा विचार मुली करतात.

5) घरात भावंड खूप असल्यास मुली लग्न करताना थोडा विचार करतात. घरातील मोठ्या मुलाचं स्थळ आल्यास मुली त्याच्या इतर भावंडांची चौकशी करतात. कारण घरातील मोठा मुलगा म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या काय हे जाणून घेण्यात मुली पहिला विचार करतात.
थोडे नवीन जरा जुने