वाढणा-या वजनाचा दुष्परिणाम म्हणजे येणारा थकवा, न्यूनगंड त्यावर हे उपाय करा



आधुनिक जीवनामध्ये मनुष्याच्या मनावर येणारा ताणतणाव हा मोठा घातक घटक ठरत असून ताणतणावाचा दुष्परिणाम म्हणजे वाढणारे वजन, वाढणा-या वजनाचा दुष्परिणाम म्हणजे येणारा थकवा, न्यूनगंड इत्यादी. हा ताणतणाव नुसतेच वजन वाढवत नाही तर ब-याच आजारांना आमंत्रणही देतो. उदा. डायबिटीस, ब्लड प्रेशर, डिप्रेशन इत्यादी. वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.
उपाय -

खरबूज -
ताजेपणा अनुभवण्यासाठी खरबूज सर्वात चांगले फूड आहे. यामध्ये केवळ 45 कॅलरी असते. गोड पदार्थांची आवड असणार्‍या लोकांसाठी खरबूज आरोग्यदायी आणि गोड पर्याय ठरू शकते.


पत्ताकोबी -
आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने 10 टक्के कॅलरी कमी करता येते. दररोज 2 कप कोबीच्या पानांचा रस खाल्याने 113 टक्के अधिक मात्रेत व्हिटॅमिन-ए मिळते.


पनीर -
वाढत्या वयाबरोबर स्नायू कमजोर होऊ लागतात. यामुळे चयापचय प्रक्रिया क्षीण होते. व्हे-प्रोटीनपासून बनलेल्या कॉटेज पनीरमुळे स्नायू कणखर बनतात. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते.


अक्रोड -
अक्रोडमधील प्रोटीन आरोग्यदायी आहे. हे सडपातळ होण्यासाठी चांगले असते. अक्रोड टरफलासोबतच खावे. टरफलासोबत खाल्याने जास्त खाण्याची इच्छा होणार नाही आणि शरीरासही नुकसान होणार नाही.
काळे सोयाबीन -
काळ्या सोयाबीनच्या सेवनाने स्तनाचे कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. हे खाल्याने चरबी वेगाने कमी करता येऊ शकते आणि वजनावरही नियंत्रण मिळवता येते.


तिखट -
तिखटात चरबी कमी करणारे कॅस्पिनॉइड असते. 2009 मध्ये अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात एका स्वयंसेवकाने दररोज 6 ग्रॅम कॅस्पिनॉइड ऑइलचे सेवन केले. त्यामुळे त्याचे वजन 5 पट वेगाने कमी झाले.


कमरेची चिंता सोडा, बटाटे खा
बटाटा खाणे कमरेसाठी सर्वाधिक घातक असते, असे हार्वर्डच्या एका अभ्यासात सांगण्यात आले आहे, परंतु त्यांनी ते तळलेल्या बटाट्याबद्दल सांगितले आहे. भाजलेल्या किंवा उकळलेल्या बटाट्यावर काळी मिरी आणि मीठ टाकून खाणे चांगला आहार आहे.
कॉबरेहायड्रेटचे प्रमाण अधिक असलेल्या या आहारात क जीवनसत्त्वाचेही जास्त प्रमाण आढळून येते. रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे उपयुक्त आहे. बटाटे उकळून दह्यासोबत खाल्याने नुकसान होत नसल्याचे आहारातज्ज्ञ निलांजना सिंग यांनी सांगितले आहे.


थोडे नवीन जरा जुने