धोनीच्या वडिलांच्या बाबतीतली या गोष्टी डोळ्यात पाणी आणणाऱ्या

भारताचा महान क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी ला कोण ओळखत नाही. त्याला तुम्ही क्रिकेटच्या मैच मध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहिले असेलच पण वैयक्तिक आयुष्यात त्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल, धोनी बद्दल अत्यंत कमी लोकांना माहीत आहे की त्याचे वडील पानसिंह यांनी त्याला क्रिकेटर बनवण्यासाठी काय काय मेहनत घेतली आहे. चला आज तुम्हाला सांगतो त्याच्या वडिलांच्या बद्दलत्या गोष्टी ज्या समजल्यावर तुम्ही हळवे व्हाल
अशी आहे अनटोल्ड स्टोरी

एमएस धोनी: ड अनटोल्ड स्टोरी मध्ये सांगितले आहे की वडील पानसिंह जे MECON मध्ये पंप ऑपरेटर म्हणून काम करत होते, पण याअगोदर 1960 मध्ये उत्तराखंडच्या अलमोरा जिल्ह्यातून रांचीला आले होते. रांची मध्ये आल्यावर त्यांच्या वडिलांनी दिवसरात्र मजदूरी केली. असे बोलले जाते की धोनीच्या कुटुंबाची स्थिती यावेळी नाजूक होती.

गरीब कुटुंबात झालेला जन्म

जेव्हा पानसिंह रांचीला आले होते तेव्हा ते मजुराचे काम करत होते. आणि हा त्यांच्या संघर्षाचा काळ होता पण त्यांनी कधीही आपल्या मुलांच्या संगोपनात कोणतीही कमी भासू दिली नाही.

असे बदलले धोनीचे नशीब

एमएस धोनीचा जन्म 7 जुलै 1981 ला झाला होता. त्याच्या बहिणीचे नाव जयंती धोनी गुप्ता आहे, त्याच्या आईचे नाव देवकी धोनी आहे आणि ती एक सिंपल हाउसवाइफ आहे. धोनी क्रिकेट मध्ये येण्या अगोदर रेल्वेमध्ये काम करत असे.

त्याने नंतर हळूहळू धोनीने क्रिकेट खेळणे सुरु केले आणि 2004 मध्ये सौरव गांगुली ने त्याला टीम इंडिया मध्ये खेळण्याची संधी दिली. त्यानंतर धोनीने कधी ही मागे वळून पाहिले नाही आणि तो नवनवे शिखरे गाठत गेला. आज त्याचे नाव महान क्रिकेटरच्या यादी मध्ये घेतले जाते.
थोडे नवीन जरा जुने