भेंडी खाण्याची 'ही' ट्रिक कोणत्याही प्रकारची कमजोरी दूर करेल
भेंडी एक फळभाजी असून शेतामध्ये तसेच घराच्या बागेत या भाजीचे उत्पन्न घेतले जाते. सामान्यतः लोक भेंडीकडे फक्त भाजीच्या स्वरुपात बघतात परंतु आदिवासी भागांमध्ये विविध रोगांवर उपचाराच्या हेतूने भेंडी उपयोगात आणली जाते.

जाणून घ्या, भेंडीचे उपयोग...
मध्यप्रदेशमधील पाताळकोट येथील हर्बल उत्पादने जाणकार भुमका हे नपुंसकता दूर करण्यासाठी पुरुषांना कच्ची भेंडी चावून खाण्याचा सल्ला देतात. येथील आदिवासी शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी भेंडीचा वापर करतात.


डाँग- गुजरात राज्यातील आदिवासी भेंडीचा काढा तयार करून सिफि़लिस (एक यौनसंचारित रोग जो ट्रिपोनीमा पैलीडियम नावाच्या जिवाणूमुळे होतो) आजार असेलेल्या व्यक्तीला दिला जातो. ५० ग्रॅम भेंडी बारीक कापून २०० मि.ली. पाण्यामध्ये उकळून घेतली जाते. जेव्हा हे पाणी उकळून अर्धे शिल्लक राहते तेव्हा आजारी व्यक्तीला पिण्यासाठी दिले जाते.एक महिना हा काढा नियमित घेतल्यास आराम मिळतो.


भेंडीतील बिया वाळवून त्यापासून तयार केलेले चूर्ण लहान मुलांना खाऊ घालावे. असे मानले जाते की, या बिया प्रोटीनयुक्त असतात आणि उत्तम आरोग्यासाठी लाभदायक असतात. हे चूर्ण टॉनिकप्रमाणे कार्य करते.


मधुमेह आजार असणार्या लोकांनी भेंडीच्या बियांचे चूर्ण (५ ग्रॅम), विलायची(५ ग्रॅम), दालचिनी सालीचे चूर्ण (३ ग्रॅम) काळे मिरे (५ दाणे) एकत्र घेऊन त्याचे एकजीव मिश्रण तयार करा. दररोज दिवसातून ३ वेळेस हे मिश्रण कोमट पाण्यातून घेतल्यास आराम मिळेल.


मधुमेह आजार असणार्या लोकांनी नियमित भेंडीच्या भाजीचे सेवन करावे. ताजी भेंडी या आजारामध्ये जास्त प्रभावकारी ठरते.


कावीळ, ताप, सर्दी खोकला या आजरांमध्ये मधोमध कापलेल्या पाच भेंड्या अर्धा चमचा लिंबाचा रस, डाळिंब आणि आवळ्याच्या पाकळ्या (५-५ ग्रॅम) ही सर्व सामग्री एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. दुसर्या दिवशी सकाळी हे मिश्रण चांगल्याप्रकारे कुटून घ्या. दररोज दोन वेळेस नियमित सात दिवस या मिश्रणाचे सेवन करा. या उपायाने कावीळ सारखा घातक आजार एक आठवड्याच्या आत नियंत्रणात येतो.

आदिवासी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कच्ची भेंडी चावून खाल्यास वीर्य आणि शुक्राणू मात्रामध्ये वाढ होते.

थोडे नवीन जरा जुने