डोकेदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जाणून घ्या निदान, कारणे आणि लक्षणे !

डोकेदुखी हे एक लक्षण आहे. त्याच्या मुळाशी जाता अनेकविध कारणे स्पष्ट होऊ शकतात. त्याचबरोबर त्याचे निदानही वेगवेगळे असू शकते. डोकेदुखी बरी करणे म्हणजे त्याचे मुळापासून उच्चाटन करणे! नुसती वेदना शमविणे म्हणजे त्यावर उपाय होणार नाही. नियंत्रणासाठी त्याचे निदान, कारणे आणि लक्षणे यांचा अभ्यास करून औषधे देणे गरजेचे आहे.


डोकेदुखीची कारणे :
१> टेन्शनमुळे डोकेदुखी - सर्वात जास्त आढळणारा प्रकार आहे. डोके जड वाटणे, झोप न येणे, कामात लक्ष न लागणे, मुंग्या जाणवणे, उजेड व आवाज यामुळेही त्रास वाटणे.

२> अर्धशिशी - डोकेदुखीसोबत मळमळ, भूक नाहीशी होणे, उलटी होणे ही लक्षणे दृष्टीशी निगडित असू शकतात. अंधारी येणे, काळे अथवा रंगीत ठिपके दिसणे, चक्कर येणे.

३> सायनुसायटिस - नाकाच्या दोन्ही बाजूस कपाळावर (भुवईच्या वर) आवाज घुमण्यासाठी ज्या पोकळ्या असतात. त्यात सर्दीमुळे नाकात उघडणारी छिद्रे बंद झाली की कफ साठायला लागतो. त्या दुखायला लागतात. या त्रासाला sinusitus म्हणतात. खाली वाकणे, आडवे पडणे, धक्का- हादरा यांनी वेदना वाढतात.

४> ब्लडप्रेशर - सकाळी उठल्याबरोबर डोक्याच्या मागच्या भागात वेदना होतात. त्याचबरोबर घाबरेघुबरे होणे, छातीत दुखणे, श्वास जड होणे, चक्कर येणे.

५> डोळ्यांचे आजार - काचबिंदूसारख्या आजारात डोळ्यांतील दाब वाढतो. तीव्र प्रकारची डोकेदुखी, डोळे लाल होणे, दृष्टी अधू होते.

६> आम्लपित्त- यात डोकेदुखीबरोबर पोटात आग होणे, मळमळणे, छातीच्या हाडाच्या खाली वेदना जाणवते. उलटी होऊन पित्त पडल्यावर आराम वाटतो.

७> Reffered Headache - दातामधील किड, दातांच्या मुळांना सूज येणे, यामुळेसुद्धा डोकेदुखी होऊ शकते. वेदना दातात सुरू होऊन डोक्याकडे जाताना जाणवते. जबड्याची हालचाल करताना त्रास होतो.
डोकेदुखीवर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेण्याचा प्रयत्न करू नये.

There are many causes for headache, know the diagnosis, the causes and symptoms
थोडे नवीन जरा जुने