मुलांची उंची न वाढण्यामागे 'ही' कारणे असू शकतात...


मेंदूच्या पायथ्याशी असणा-या पिच्युटरी ग्रंथीमुळे ही समस्या निर्माण होते. पिच्युटरी ग्रंथी शरीरातील वाढीच्या हार्मोनची निर्मिती करण्याचा वेग कमी करते. या वेळी ती समस्या उद्भवते. हे हार्मोन्स रक्तात मिसळून यकृताला इन्सुलिनसारख्या द्रवाचे उत्पादन करायला प्रेरित करते. यामुळे मुलांची उंची खुंटण्याला सुरुवात होते. 

जन्मापूर्वी आणि जन्मानंतरही जीएचडीचे परिणाम उद्भवू शकतात. जन्मानंतर होणा-या आजारांमध्ये हे व्यंग अपघात, इन्फेक्शन, डोक्यातील रेडिएशन किंवा ब्रेन ट्यूमरसारख्या इतर आजारांमुळेही उद्भवू शकते. साधारणत: मुलांची वाढ प्रतिवर्षी 5.8 सेंटिमीटर होणे अपेक्षित असते, पण जीएचडीची समस्या उद्भवणारी मुले यापेक्षा कमी उंचीने वाढतात. अनेक घटनांमध्ये मुले किंवा मुली सामान्यत: इतर मुलांप्रमाणे वाढतात त्यापुढील कालावधीत मात्र त्यांची वाढ खुंटते. मुलांची उंची, रक्तवाहिन्या आणि हाडांचा विकास, मेदाचे वितरण करण्याची जबाबदारी ही वाढीच्या हार्मोनवर असते. जीएचडीच्या समस्येमुळे या मुलांच्या कमरेपाशी किंवा चेह-यावर फॅट जमा होतो. मोठ्या मुलांमध्ये वयात येण्याची प्रक्रिया होतच नाही किंवा ही मुले उशिरा वयात येतात. या मुलांच्या केसांची वाढच अधिक असते.
लक्षणे-
जीएचडीने त्रस्त मुलांना भविष्यात विविध शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. यात हृदयाची मजबुती, फुप्फुसांची क्षमता, हाडांची मजबुती, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा समस्यांचा समावेश आहे.
उलट्या, जुलाब, ताप, वजन कमी होणे, कमी खाणे-पिणे, कमी पोषण, डोकेदुखी, उशिरा वयात येणे, याबरोबरच उंची कमी असणे, अधिक वजनामुळे खुंटणारा हार्मोनचा विकास.
निदान आणि उपचार- 
जीएचडीचे निदान लवकर झाल्यास त्यावर चांगले उपचार करता येतात. मुलांच्या वाढीचे मोजमाप करताना एका वाढीच्या तक्त्यानुसार काम केले जाते व अन्य मुलांच्या तुलनेत ही वाढ तपासली जाते. मुलांच्या वाढीच्या तक्त्यावर अचूक नोंदी केल्यास मुलाची वाढ किती खुंटली आहे व त्यावर कोणते उपचार गरजेचे आहे हे समजते. परिणामी जीएचडीने बाधीत मूल आणि सामान्य मुलांची वाढ यातील तफावत लक्षात घेऊन उपचार
करता येतात. योग्य उपचारांसाठी या मुलांची वाढ किती वेगाने होते आहे याची नोंद घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.


व्यंगाचे निदान झाल्यावर करता येऊ शकणारे उपचार -
एन्डोक्रोनोलॉजिस्ट (हार्मोन्सचा अभ्यास करणारे तज्ज्ञ) पुढील चाचण्यांच्या आधारे मुलांची वाढ खुंटण्याचा अभ्यास करतात.
थायरॉक्सिन आणि थायरॉइड सिम्युलेटिंगची चाचणी
सिरम इलेक्ट्रोलाइट्सच्या आधारे किडनीची चाचणी घेणे
कम्प्लिट ब्लड काउंट
एक कॅरोटाइप (व्यक्तीच्या क्रोमोझोमचा अभ्यास) करून मुलींमध्ये टर्नर सिंड्रोम नसल्याची खात्री केली जाते.
हाताचा एक्स-रे (विशेषत: डाव्या हाताचा) काढून हाडाचा आकार आणि ठिसूळपणा तपासला जातो.
डोक्याचा एमआरआय काढून हायपोथॅलॅमस आणि पिच्युटरी ग्रंथींची तपासणी केली जाते.
खुंठलेल्या वाढीमुळे मुलांच्या मनात न्यूनगंड तयार होतो किंवा सामाजिकदृष्ट्याही मुलांना मानसिक त्रास होतो. 

नियमित तपासणीमुळे मुलांच्या वाढीची नोंद ठेवता येते. याचा फायदा ग्रोथ हार्मोन थेरपीचा डोस किती नियंत्रणात ठेवावा हे समजते.
मुलांची वाढ कमी प्रमाणात होत राहिल्यास बरोबरीच्या मुलांकडून चिडवले गेल्याने होणारा त्रास मुलांच्या आत्मविश्वासावर प्रतिकूल परिणाम करतो.
यामुळे या मुलांना मानसिक आधार देण्याची अत्यंत गरज असते.
जीएचडीबाबतची निरीक्षणे -
सुमारे 3800 नवजात बालकांमागे एका मुलात आयडीओपॅथिक जीएचडीचे प्रमाण आढळते.
जीएचडीचे प्रमाण मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये तीन ते चार पटींनी अधिक असल्याचे दिसून येते.
युकेमिया, मध्यमकर्ण किंवा नॅसोफॅरिंगल ट्यूमरवरील उपचारांदरम्यान रेडिएशन थेरपी घेतलेल्या 65 टक्के मुलांमध्ये वाढीचे हार्मोन कमी दिसून येतात.
चेहरा, कवटी यांच्याशी निगडित व्यंग उदा. दुभंगलेले ओठ किंवा टाळू असलेल्या मुलांमध्ये वाढीचे हार्मोन्स कमी होण्याची शक्यता असते.

There may be 'reasons' for children not to grow up
थोडे नवीन जरा जुने