म्हणून महिलांना वाटते की पतीने तिच्यासाठी जेवण बनवावे
मुंबई – आपल्या देशात बहूतेक घरांमध्ये महिलाच जेवण बनवितात… मग ती हाउस वाईफ असो किंवा ऑफीसला जाणा-या महिला असो…. मात्र, तुम्ही जेव्हा बाहेर जेवायला जाता त्यावेळी तुम्हाला तेथे अनेकदा पुरुषच जेवण बनविता दिसतात. एवढेच नाही तर मोठ-मोठ्या रेस्टॉरंटमध्येही शेफ पुरुषच असतात.

यामुळे ही गोष्ट स्पष्ट आहे की पुरुषही जेवण बनविण्यात कमी नाहीयेत. मात्र, असे असले तरी घरी जेवणं बनविण्याचं काम महिलाच करतात. असे नाहीये की पुरुष किचनमध्ये महिलांना मदत करत नाहीत. परंतु, या मदत करणा-या पुरुषांची संख्या फारच कमी आहे.

हे पण तितकचं खरं आहे की प्रत्येक महिलेला वाटते की तीच्या पतीने तिच्यासाठी जेवण बनवावे. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भातील काही रहस्य सांगणार आहोत.

स्पेशल फिल –

प्रत्येक महिला आपल्या पतीकडून जास्त प्रेम मिळेल अशी अपेक्षा करत असते. तिला असे वाटते की तिच्या पतीने तिच्यासाठी काही खास करावे ज्यामुळे तीला चांगले फिल होईल. तसेच महिलांनाही वाटते की तिच्या नव-याने त्यांच्यासाठी जेवण बनवावे. अशामुळे नात्यामध्ये प्रेम आणखीन वाढते तसेच दररोजच्या आयुष्यात बदलावही येतो.

सोबत वेळ घालविणे –

सध्याच्या काळात प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे कामावर जाणा-या पुरुषांकडे इतका वेळ नसतो की ते आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवू शकतील. त्यामुळे जेवण बनविताना ते आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ राहू शकतात. एकत्र राहिल्याने अतुट नाते निर्माण होण्यास मदत होते.

मुलांसाठी शिकवण –

मुलांसाठी त्यांचे घरचं पहिली शाळा असते, जेथे ते आसपासचे वातावरण पाहून खुप काही शिकतात. जेव्हा मुलं आपल्या आई-वडीलांना काम करताना पाहतात त्यावेळी त्यांच्या मनात घरातील कामासंदर्भात एक वेगळाच आदर वाढतो. ज्या मुलांना वाटते की बाहेर काम करणे म्हणजेच सर्व काही अशा मुलांसाठी ही एक चांगली शिकवण आहे.

दैनंदिन जिवनात बदल –

दररोज एकच शेड्युलमुळे प्रत्येकजण कंटाळतो त्यामुळे कधी-कधी पतीने जेवण बनविले तर आयुष्यात बदलाव पहायला मिळतो. यामुळे तुम्ही प्रत्येक काम इन्जॉय करता करता कराल.
थोडे नवीन जरा जुने