लग्नानंतरची पहिली रात्र यादगार करण्यासाठी या खास १० टिप्स!
लग्नानंतर कोणत्याही जोडप्याची पहिली रात्र ही त्यांच्यासाठी उत्सुकतेची पण तेवढीच टेन्शनची बाब असते. दोघांच्याही मनात प्रश्नांनी काहूर केलेला असतो. पण ही रात्र त्या दोघांसाठी नव्या प्रवासाची सुरूवात असतो, त्यामुळे हा प्रवास अधिक चांगला आणि अधिक यादगार व्हावा याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. भारता सारख्या देशात कामसूत्रासारखा महान ग्रंथ रचला गेला. पण आजही भारतात यावर खुलेपणाने बोलणे टाळले जाते. मधुचंद्राची ही रात्र त्या दोघांना नव्या विश्वात नेणारी आणि ऎकमेकांना जाणून घेण्याची ही रात्र आहे. त्यामुळे ही रात्र नेहमीसाठी यादगार करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, यासाठी काही टीप्स आम्ही घेऊन आलो आहोत.

१) मधुचंद्राच्या रात्री शारिरीक संबंध ठेवण्याआधी एक रोमॅंटिक वातावरण तयार केलं पाहिजे. यासाठी रूममध्ये विशेष प्रकारचे रंग आणि सुगंधाचा वापर केला पाहिजे. यामुळे सेक्स हार्मोन्स वाढवले जातात. रूममध्ये जास्त प्रकाश ठेवण्यापेक्षा कमी प्रकाश ठेवा. हळू आवाजात गाणी लावा याचीही फार मदत होते.२) सेक्स क्रिया करण्यासाठी घाई करू नका. त्याआधी ऎकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ऎकमेकांच्या मनातील गोष्टी शेअर करा. अर्थातच जर अरेंज मॅरेज असेल तर दोघेही ऎकमेकांना पूर्णपणे जाणत नसतीलच. तोच प्रयत्न केल्यास अधिक आनंद घेता येईल. संवाद झाल्यास शारिरीक संबंध ठेवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

३) सेक्स करण्याआधी आपल्या जोडीदाराची इच्छा जाणून घ्या. जोडीदाराशी बोलून त्याच्या/तिच्या अडचणी विचारा. बोलण्यातून मार्ग निघाला तर त्याचा तुम्हालाच फायदा होईल. दोघांमध्येही असलेली भीती निघून जाईल आणि ही रात्र तुम्ही जगू शकाल.

४) सेक्स करण्याआधी पार्टनरला सरप्राईज देण्याचा प्रयत्न करा. पहिल्याच रात्री असं काही केलं तर त्याचा आनंद दोघांनाही मिळेल. कोणतही गिफ्ट द्या.

५) पहिल्या रात्री सेक्स करण्याआधी फोरप्ले खूप आवश्यक असतो. फोरप्ले केल्याने सेक्स करण्याचा आनंद अधिक जास्त मिळते. त्यासाठी ऎकमेकांना किस करा. खास अंगावर स्पर्श करा.

६) तुम्ही सेक्युअल फॅंटसीचाही आधार घेऊ शकता. जोडीदारासोबत सेक्स संबंधी गोष्टी करा. सेक्ससंबंधी ऎकमेकांशी बोला. याने तुम्ही सहज व्हाल.

७) या पहिल्या रात्री अल्कोहोल आणि सिगारेट चुकूनही पिऊ नका. अक्लोहोलमुळे पुरुषांमध्ये लगेच इरेक्टाईल प्रॉब्लेम आणि स्त्रियांना व्हजायनल ड्रायनेसची समस्या येऊ शकते. यामुळे सेक्स करताना अडचण येऊ शकते.

८) सेक्स करण्याआधी सुरक्षेचाही विचार केला पाहिजे. कंडोमचा वापर करा. यामुळे अनेक आजार होणार नाहीत. तसेच फॅमिलि प्लॅनिंगसाठीही हे आवश्यक आहे.

९) मानसिक, शारिरीक आणि भावनीक पातळ्यांवर फिट रहा. जोडीदाराला आवडीचे कपडे घाला. याने सेक्समध्ये रोमांच आणखी वाढतो.

१०) पहिल्याच रात्री कोणताही प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. आधी ऎकमेकांना थोडा वेळ द्या. ऎकमेकांना समजून घ्या. त्यानंतर आपोआप सर्व गोष्टी सोप्या होतील.

थोडे नवीन जरा जुने