'हे' आहेत मशरूम खाण्याचे फायदे, जाणून घ्या !


मशरूममध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्याची शरीराला मोठी गरज असते. तसंच मशरूमपासून शरीराला मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. त्यामुळे मशरूमचा उपयोग औषधी म्हणूनही केला जातो. तसंच यात कॅलरीची मात्रा देखील कमी असते. यासोबतच यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. त्याशिवाय मशरूममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो.

जाणून घेऊया मशरूम खाण्याचे फायदे
मशरूममध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.
मशरूममध्ये असणारे पोषक तत्व रोग प्रतिरोधक क्षमता वाढवतात. याने सर्दी पडसं सारखे आजार वारंवार होत नाही. मशरूममध्ये उपस्थित सेलेनियम इम्यून सिस्टमच्या रिस्पॉन्सला मजबूत बनवतो.
मशरूम विटामिन डीसाठी चांगला पर्याय आहे. डी व्हिटॅमिन हाडांच्या मजबुतीसाठी फारच गरजेचे आहे. मशरूममध्ये सेवन नियमित केले तर आवश्यकतेचे 20 टक्के व्हिटॅमिन डी सहज मिळते.

मशरूममध्ये फारच कमी मात्रेत कार्बोहाइड्रेट्स असतात, ज्याने वजन आणि ब्लड शुगर लेवल वाढत नाही.
मशरूममध्ये फारच कमी मात्रेत कोलेस्टरॉल असल्यामुळे याचे सेवन केल्याने बर्‍याच वेळेपर्यंत भूक लागत नाही.
मशरूम केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फार फायदेशीर आहे. काही संशोधनात असे आढळून आले आहे की मशरूमच्या सेवनामुळे कँसर होण्याचा धोका कमी असतो.

These are the benefits of eating mushrooms, know it
थोडे नवीन जरा जुने