नग्न झोपल्याचे हे आहेत फायदे!

पूर्णपणे नग्न होऊन झोपण्यात अनेकांना चांगलं वाटत नसेल. पण असे नग्न झोपणे नाकारण्याआधी त्याचे अनेक फायदेही आहेत हे जाणून घ्या. नग्न झोपण्याचे अनेक आरोग्यदायी आणि मानसिक फायदेही आहेत. नग्न झोपल्याने बुद्धीमध्ये असे काही हार्मोन्स तयार होतात, ज्याने तुमचं तुमच्या पार्टनरशी असलेलं नातं आणखी घट्ट होत. दोघांमधील शारिरीक संबंधाविषयी रूची वाढवतं.

* स्किन टू स्किन कॉन्टॅक्टने ‘ऑक्सीटॉसीन’ हार्मोन्स निर्माण होतात, जे तुमची शारिरीक संबंध ठेवण्याची ताकद आणि रूची वाढवतात. शिवाय टेन्शन देणारे हार्मोन्स कमी करतात. ऎकमेकांमधील विश्वास वाढवतात. प्रत्येक रात्री तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर जर पूर्णपणे नग्न अवस्थेत झोपलात तर, डोक्यापासून पायाच्या टोकापर्यंत तुम्हाला होणारा स्पर्श अनेक नवीन उपयुक्त हार्मोन्सची निर्मिती करतो.

* स्किन कॉन्टॅक्ट फक्त हार्मोन्सची निर्मिती करीत नाहीतर त्याशिवाय दोन शरीरातील बॉन्ड सुद्धा वाढवतात. नग्न एकत्र झोपल्याने तुमच्यातील नातं अधिक घट्ट होतं आणि तुम्ही अधिक जवळ असल्याचं फिल करू शकता. लक्षात ठेवा की, कधीही दोन शरीरांची जास्त जवळीक ही सेक्सची ईच्छा वाढवते

* शिवाय नग्न एकत्र झोपल्याने तुमच्यातील दुरावलेले नाते कमी होते. तुम्ही ऎकमेकांच्या अगदी जवळ आल्याचे जाणवेल. तुमच्या नात्यातील अडथळे याने दूर होतात.

* पूर्णपणे नग्न होऊन एकत्र झोपल्याने तुमच्या पतीतील सेक्सची ईच्छा अधिक वाढते. नग्नपणे झोपणे म्हणजे सेक्स करण्यासाठीचे खुले आमंत्रणच आहे. पूर्णपणे नग्न होऊन जर तुम्ही तुमच्या पतीसमोर गेलात तर त्याची सेक्स करण्याची इच्छा अधि तीव्र होईल. शिवाय तुम्ही अधिक मोहक आणि मादक दिसाल.

* पूर्णपणे नग्न होऊन ३० मिनिटे ते १ तासापर्यंत रोज चालणारा प्रणय हा तुम्हाला पूर्णपणे संतुष्ट करू शकतो. याने तुमचे आयोग्यही खूप चांगले होते.

नग्न झोपण्याचे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला पार्टनर हवाच असेही काही नाहीये, असे अभ्यासातून समोर आले आहे.

* तुम्ही एकटेही नग्न होऊन झोपल्यास तुम्हाला तणावमुक्ती मिळू शकते. शिवाय तुमच्या एनर्जीतही वाढ होते. तुमचा आत्मविश्वास सुद्धा याने वाढतो.


थोडे नवीन जरा जुने