'हे' आहेत घरासमोरील तुळशीचे औषधी गुणधर्म...


हिंदू संस्कृतीत तुळस पवित्र मानली जाते , तर आयुर्वेदात ती कफ - वायुनाशक वनस्पती गणली जाते . तुळशीमध्ये ' फनोर नावाचे तत्त्व असते . ते क्षयनाशक आहे . आधुनिक औषध स्ट्रेप्टोमायसीनचा दहावा भाग आणि आयनोसिएझिडपेक्षा चार पटीने जास्त क्षयनाशक क्षमता तुळशीमध्ये असते.

प्रत्येक हिंदूच्या घरी तुळस असतेच , तुळस डासांना घरात प्रवेश करू देत नाही . इतकेच नव्हे तर कॅन्सर , अ‍ॅसिडिटी , पोटात दुखणे इ . ८८ प्रकारच्या दुखण्यांवर तुळस प्रभावी इलाज आहे . तुळशीच्या सुगंधाने आसपासचे वातावरण शुद्ध व जंतुरहित होते . तुळशीची पाने, आणि मंजिरी बी यापासून येणारा वास श्वासावाटे शरीरात जाऊन फुप्फुसाला नवे बळ देते . शरीर व मनाला स्फूर्ती येते . देवाला नैवेद्य दाखविताना , ग्रहण काळात अन्नात तुळशीची चार - पाच पाने टाकतात . त्यामुळे अनदृषि होत नाही . आजही ग्रामीण भागातील भाविक देवाची पूजा केल्यावर पाणी तुळशी वृंदावनात टाकतात. व तुळशीची किमान दोन पाने तरी खातातच , याचे कारण तुळशीचे मूळ , पाने आणि मंजिरी औषधी गुणांनी युक्त आहे . हिवाळ्यात तुळशीची पाने खाणे जास्त उपयुक्त असते . असे केल्यास वर्षभर तुमचे शरीर स्फूर्तिदायी आणि निरोगी राहील .

तुळशीचे काही महत्त्वाचे उपयोग

तुळशीच्या पानांचा आणि आल्याचा रस दोन थेंब नाकात टाकल्यास अर्धशिशी व डोकेदुखी बरी होते .

तुळशीची चार पाच पाने दोन ग्रॅम दही मिसळून खाल्ल्यास अतिसार आणि पोटात येणारा मुरडा दूर होतो .

सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीची ४ - ५ पाने खाऊन पाणी प्यायल्यास स्मरणशक्ती वाढते .

These are the medicinal properties of basil in front of the house
थोडे नवीन जरा जुने