ह्या कारणांमुळे होऊ शकतो रक्तदोष...जाणून घ्या !

मनुष्याच्या शरीरातील रक्त हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. माणसाच्या शरीरात सर्व ठिकाणावरून रक्तच वाहत असते. काही कारणामुळे या शुद्ध रक्ताचे रूपांतर अशुद्ध रक्तात झाल्यास अनेक रक्तज रोग तयार होतात. 

आयुर्वेदात वात, पित्त, कफ असे तीन दोष आहेत. काहींनी रक्तालाही दोष मानले आहे. रक्त हा धातू आहे. आयुर्वेदात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सर्व धातूपैकी रक्त हा धातू दुस-या धातूंना विकृत करतो. तसेच दुस-या दोषामुळे विकृत होतो. तेव्हा अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करतो. त्यापैकी काही रोगांची माहिती येथे देत आहोत. 

रक्तविकारामध्ये कुष्ठ हा व्याधी प्रामुख्याने मोडतो. याशिवाय विसर्प, रक्तपित्त, विद्रोही पदर, वातरक्त, पूर्ण शरीराच्या त्वचेमध्ये कोरडेपणा येणे, तृष्णा, दाह, ज्वर, शीर शूल, जेवणानंतर पोटात दाह होणे, अत्याधिक अशक्तपणा, अतिनिद्रा, अनिद्रा शरीराची पचनक्रिया बिघडून थकवा येणे. यामुळे अंगावर खाज, कोड, फुणशी, चकमे, पीडिका, अरूषिंक, कोड हे विकार उद्भवतात. 

लक्षणे - आजकाल अ‍ॅलर्जीमुळे जे अनेक आजार रुग्णांना भेडसावत आहेत त्या सर्वांचे मूळ रक्तदोषात आहे. उदा. पित्तदोषाचा प्रकोप झाल्यास रक्तातील उष्णता वाढून त्यापासून लालसर पुरळ, खाज येणे, त्वचेची आग होणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. या रक्तदोषामुळे त्वचारोग होतात. ही आयुर्वेदाची मूळ संकल्पना आहे.

रक्तदोष निर्माण होण्याची कारणे : रक्तदोष निर्माण होण्याची कारणे अनेक आहेत. बद्धकोष्ठता हे मुख्य कारण आहे. त्यामुळे रक्तशुद्धी होत नाही. अन्नपान सेवन, वारंवार खाण्याचा अतिरेक, उन्हात फिरणे, दही, मासे, आंबट-खारट पदार्थ, उडीद, गूळ, तिखट, मिठाईयुक्त पदार्थ यांचे अतिसेवन, अन्नाचे योग्य पचन न होणे, सतत हॉटेलचे पदार्थ खाणे, झोपेच्या वेळा नियमित नसणे यामुळे तिन्ही दोषांचा प्रकोप होऊन रक्तधातूत विकृती निर्माण होते. 

रक्तदोषावर उपचार : प्रथम आहारातून तिखट, तेलकट, लवणयुक्त पदार्थ वर्ज्य करावेत. दही, गूळ, मिष्टान्न भोजन, आंबवलेले पदार्थ, चिंच, सॉस यासारखे पदार्थ खाऊ नयेत. जुने तांदूळ, गहू, दूध, फळे, पचनास हलका आहार सेवन करावा. रक्तशुद्धीसाठी मंजिष्ठा, त्रिफळा, हळद, धणे, दारूहळद याचा काढा करून घ्यावा. हिरडा, सैंधव, जिरे यांचे चूर्ण घ्यावे.
कडुनिंबाची कोवळी पाने वाटून, गाळून त्याचा रस साखर मिसळून घ्यावा.
हळद, सुंठ, जिरे, पिंपळी, दालचिनी, वेलदोडे, तेजपान, वावडिंग, त्रिफळा, नागकेशर याचे चूर्ण तुपातून घ्यावे.

पित्तपापडा, नागकेशर, वावडिंग, ओवा, धणे, जिरे, मंजिष्ठा याचे समभाग करून चूर्ण तूप व खडीसाखरेतून घ्यावे. रात्री झोपताना हळद घालून दूध घ्यावे. याचबरोबर याआधी सांगितलेल्या व्याधीनुसार चिकित्सा केली जाते. ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे योग्य राहील.

These causes can cause bleeding ... Learn
थोडे नवीन जरा जुने