हाताने तयार केल्या गेलेल्या या मुद्रा जास्त कष्ट न करता लठ्ठपणा, अनिद्रा, डोळ्यांच्या आजारापासून तुम्हाला दूर ठेवतील



योग आणि प्राणायाम केल्याने कोणताही असाध्य आजार ठीक होऊ शकतो असे मानले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का योग मुद्रासुद्धा तेवढ्याच प्रभावी असतात.

हाताने तयार केल्या गेलेल्या या मुद्रा जास्त कष्ट न करता तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यास सक्षम आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास योग मुद्रांची माहिती देत आहोत.

ज्ञान मुद्रा -
एखाद्या शांत आणि शुद्ध वातावरणामध्ये आसन टाकून त्यावर पद्मासन किंवा सुखासनात बसा. त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. त्यानंतर अंगठ्याजवळील बोट तर्जनी (इंडेक्स फिंगर) वाकवून त्याच्या टोकाला अंगठ्याचा टोकाचा स्पर्श करावा. बाकीचे तिन्ही बोटे सरळ ठेवावीत. अंगठा आणि तर्जनी बोट मिळवल्याने जी मुद्रा तयार होते तिला ज्ञान मुद्रा म्हणतात.

लाभ - मानसिक रोग म्हणजे अनिद्रा किंवा जास्त झोप, कमकुवत स्मरणशक्ती, रागीट स्वभाव यामध्ये ही मुद्रा फायदेशीर ठरते.

सूर्य मुद्रा -
हाताचे अनामिका बोट (करंगळीच्या शेजारील बोट) वाकवून अंगठ्याच्या मुळाशी लावावे आणि त्यावर अंगठ्याचा हळूच दाब द्यावा. इतर तिन्ही बोटे एकदम सरळ ठेवावीत. अनामिका आणि अंगठा मिळून जी मुद्रा तयार होते तिला सूर्य मुद्रा म्हणतात.

लाभ - लठ्ठपणा आणि शरीरावरील अनावश्यक चरबी दूर करण्यासाठी ही एक उपयुक्त मुद्रा आहे.
प्राण मुद्रा -
हाताची करंगळी, अनामिका (करंगळीच्या शेजारील बोट) व अंगठ्याच्या टोकाचा एकमेकांना स्पर्श करावा. इतर दोन्ही बोटे सरळ स्थितीमध्ये ठेवा. करंगळी, अनामिका आणि अंगठा मिळून जी मुद्रा तयार होते तिला प्राण मुद्रा म्हणतात. ही मुद्रा प्राणशक्तीचे केंद्र आहे.

लाभ - ही मुद्रा केल्याने शरीर निरोगी राहते. डोळ्यांचे आजार दूर करण्यासाठी चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ही मुद्रा खूपच प्रभावकारी आहे.
थोडे नवीन जरा जुने