महिलांनी बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी करा हे उपाय !


प्रसूतिनंतरचा काळ हा दुग्धन काळ असतो. हा काळ मातेचं वजन कमी करण्याच्या दृष्टीने अतिशय योग्य काळ असतो. बाळाला पुरेशा पोषणाची गरज असल्याने योग्य आहाराबरोबरच व्यायामाचीदेखील गरज असते. मागच्या भागात आपण काही आसनं पाहिली. उरलेल्या आसनांची माहिती आज करून घेऊयात.
सर्वांगासन- ‘सर्व अंग’ स्थिती

जमिनीवर पाठीवर झोपावे.

पाय गुडघ्यात न वाकवता सावकाश पाय वर उचलावेत.

जमिनीवरून कंबर वर उचलावी.

आता, सावकाश पाठीचा खालचा भागही वर उचला आणि कोपर जमिनीवर टेकून, त्याचा शरीराला आधार द्या.

तुमचे संपूर्ण शरीर आता तुमच्या खांद्याच्या आधारावर असेल.

शक्य तितका वेळ ही स्थिती कायम ठेवा.

सुरुवातीच्या स्थितीत या.

शलभासन – टोळसारखी स्थिती

पोटावर झोपा आणि हात शरीराच्या बाजूला ठेवा.

श्वास सोडत, गुडघे ताठ ठेवा आणि उजव्या पायाला वरच्या दिशेने ताण द्या.

ही स्थिती ४ सेकंद कायम ठेवा.

ही कृती डाव्या पायाने करा.

नंतर, दोन्ही पाय एकाच वेळी वर उचलून हे आसन करून पाहा.

प्रत्येक बाजूने दोन-तीन वेळा आसन करा.

हलासन – नांगरासारखी स्थिती

जमिनीवर पाठीवर झोपा.

पाय गुडघ्यात न वाकवता सावकाश पाय वर उचला.

जमिनीवरून कंबर वर उचला.

आता, सावकाश पाठीचा खालचा भागही वर उचला आणि शरीराला हातांचा आधार द्या.

आता पाय तुमच्या डोक्याकडे न्या आणि डोक्यापलीकडील जमिनीला पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

ही स्थिती कायम ठेवा आणि सावकाश सुरुवातीच्या स्थितीत या.

कटिस्नान
स्वच्छ टबमध्ये गरम पाणी भरा.
मूठभर कडुनिंबाची पाने पाण्यात उकळा आणि ते पाणी टबमधील पाण्यात मिसळा.


पाय जमिनीवर ठेवून या टबमध्ये बसा.
४ मिनिटे ‘अश्विनी मुद्रा’ करा.

या स्थितीत गाणे म्हणत, सहा मिनिटे आराम करा. योगामध्ये, मनाची संतुलित स्थिती नेहमी पुन्हा पुन्हा सुचवली जाते.

मकरासन – मगरीसारखी स्थिती :

पोटावर झोपा आणि पुढचा भाग जमिनीवर टेकलेला असावा.

पायात थोडे अंतर ठेवा आणि पायाचे पंजे एकत्र ठेवून व टाचा वेगळ्या ठेवून पाया निवांत ठेवा.

हात दुमडा आणि डोके तुमच्या पंजावर विसावलेले ठेवा.

या आसनात ३-५ मिनिटे निवांत व्हा

अश्विनी मुद्रा

उताणे झोपा, गुडघे जवळ घ्या, पाय पार्श्वभागाजवळ ठेवा

गुद्विषयक स्नायू घट्टपणे संकुचित करा.

गुद्विषयक स्नायू शिथिल करा.

ही कृती १५-२० वेळा करा.

कोणत्याही धारणेच्या स्थितीत बसून ही कृती करा.

हस्तपादनगुस्तासन – हात ते पंजे स्थिती

पायांमध्ये अंतर ठेवून जमिनीवर झोपा.

श्वास घेत, उजवा हात उजव्या कोनात वर उचला.

सोडत, उजवा पाय वर उचला आणि उजव्या पंजाला स्पर्श करा आणि तुमच्या पायाची बोटे पकडण्याचा प्रयत्न करा.

ही स्थिती काही सेकंद कायम ठेवा.

श्वास घेत, सुरुवातीच्या स्थितीत या.

डाव्या पायाने ही कृती करा. नंतर दोन्ही पायांनी करावी.

These measures to help women lose weight after childbirth
थोडे नवीन जरा जुने