वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, 'हे' उपाय नक्कीच ठरतील फायदेशीर !


These-measures-will-certainly-be-beneficial-for-controlling-the-weight-gainतुमच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण्यावर ताबा ठेवा, नियमित व्यायाम करा आणि या काही आरोग्यदायी सवयींचा नक्की तुमच्या दिनक्रमात नक्की समावेश करा.

1) जेवणापूर्वी पाणी प्या –
पाणी शरीरातील मेटॅबॉलिझम वाढवण्यास तसेच कॅलरीज कमी करण्यास मदत करतात. कारण पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते परिणामी तुमचे वजन घटते. पण जेवणापूर्वी किमान 1 तास अगोदर ग्लासभर पाणी प्यावे. यामुळे पोट भरलेले राहते.तसेच पाण्याऐवजी काही साखरयुक्त पेयं / सॉफ्ट्ड्रिंक्स प्यायल्यास विनाकारण शरीरात सुमारे 100 कॅलरीज वाढण्याची शक्यता असते. पण हेच पाणी तांब्याच्या भांड्यातून प्यायल्यास तुम्हांला अधिक फायदा होऊ शकतो.
‘जर्नल ऑफ ओबेसिटी’च्या एका अभ्यासानुसार जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास काही लोकांमध्ये 13% कॅलरीजची घट होण्यास मदत झाली.नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जर्नल ऑफ ओबेसिटी’च्या अभ्यासानुसार संशोधकांनी हा 3महिने काही लठठ लोकांवर एक प्रयोग केला. त्यानुसार लो-कॅलरी डाएट असणार्या निम्म्या लोकांना जेवणापूर्वी ग्लासभर पाणी प्यायला दिले. परिणामी त्या लोकांचे सुमारे 7 किलो वजन कमी झाले.
2) पाणीदार फळं –
जेवणापूर्वी पाणी पिणे कंटाळवाणे वाटत असल्यास पाण्याचा अधिक अंश असलेली फळं खावीत. जेवणापूर्वी केळं खाणं हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे.
3)ग्रीन टी
पाण्याऐवजी तुम्ही ग्रीन टीचा वापर करू शकता. ग्रीन टी मध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात आढळतात.
थोडे नवीन जरा जुने