गर्लफ्रेन्डला खुश ठेवण्यासाठी या खास टिप्स


बॉयफ्रेन्ड आणि गर्लफ्रेन्ड यांच्यातील भांडणे काही तशी नवीन नाही. प्रेम आहे तिथे भांडणं होणारच. पण ही भांडणं टाळणं तुमच्या हाती आहेत. भांडणं ही गैरसमजातून, रागातून किंवा आणखी कुठल्याही कारणातून होतात. त्यामुळे तुमचं नातं तुटूही शकतं. अशात नातं टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही असते. त्यामुळे हे तुमचं जिव्हाळ्याचं नातं टिकवण्यासाठी काही खास टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. खरंतर ह्या टिप्स दोघांनाही लागू पडतात.
तुमच्या प्रेयसीवर तिची चूक झाली असेल तरी जास्त रागावू नका. किंवा तिला तिची चूक लक्षात आणून देऊ नका. जर तिची चूक नेहमी नेहमी तुम्ही तिच्या लक्षात आणून दिली तर त्याचे वाईट परीणाम तुम्हाला भोगावे लागतील.

तुमच्या गर्लफ्रेन्डचा वारंवार चार चौघात अपमान करू नका. त्याने तिचे मन दुखावले जाऊ शकते. आणि तूम्ही तिला नेहमीसाठी गमावून बसू शकता.

तुमच्या मित्राच्या गर्लफ्रेन्डची प्रशंसा तुम्ही तुमच्या मैत्रीणेपुढे सतत करू नका. ती कशी चांगली आहे, ती किती समजदार आहे, अशा गोष्टी तर मुळीच करू नका. त्याने तुमची प्रेयसी दुखावली जाऊ शकते. यावरून तुमच्यात भांडणे होण्याची शक्यता जास्त आहे.

असंच कर, हेच कपडे घाल, तसे घालू नको, हॅलो म्हण, पाया पड अशा गोष्टी करण्यासाठी गर्लफ्रेन्डला कधीही फोर्स करू नका. ती जशी आहे तशीच तिला राहू द्या. शिवाय दुसरे करतात त्या गोष्टीही करण्यासाठी तिला फोर्स करू नका.

तुमची गर्लफ्रेन्ड आहे तशीच स्विकारा. तिला उगाच तिचे वागणे किंवा असणे बदलायला सांगू नका.

तुमच्या गर्लफ्रेन्डवर कुणाशी बोलावं, कुणाशी बोलू नये अशी विचित्र बंधने घालू नका. याने तिचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. तिने बाहेर जोरात हसू नये, मित्राशी हसत हसत बोलू नये, असेही बंधने लादू नका. ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते.

प्रेम व्यक्त करताना तिला जी शब्द तुम्ही दिले होते. त्याची जाणिव ठेवा. नाहीतर प्रेम व्यक्त करताना एक आणि नंतर दुसरे असे वागू नका. त्याने तुमच्यावरील तिचा विश्वास नाहीसा होऊ शकतो.

दोघांनीही भेटण्याचे ठरवले असेल तर तुम्ही दिलेली वेळ पाळणे महत्वाचे आहे. हे दोघांसाठीही लागू आहे. तिने कसातरी वेळ काढून भेटण्याचा प्लान केला असेल आणि त्यात तुम्ही उशिरा पोहचत असाल तर ते महागात पडू शकतं.

तुमच्या गर्लफ्रेन्डची तारीफ करणं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जर ती तुमच्यासाठी काही खास मेकअप करून आलीच किंवा नवा ड्रेस घातला तर आवर्जून तारीफ करा.

अनेक लफडी न करता एकीवरच जर प्रेम असलं तर हे रिलेशनसाठी खूप चांगलं असतं. दुसरी एखादी तुम्हाला चान्स देतीये म्हणून हिलाही आणि तिलाही फिरवाल तर कधी ना कधी हे उघडं पडणारच आहे. त्यामुळे हे टाळाच.थोडे नवीन जरा जुने