ओठ सुंदर गुलाबी करायचे असतील तर तुमच्या साठी या टिप्स




काळे ओठ ही एक अशी सामान्य समस्या आहे, जी सौंदर्याला प्रभावित करते.यामागचे एक मोठे कारण म्हणजे जास्त प्रमाणात स्मोकिंग करणे हे असू शकते. मुलगा असो किंवा मुलगी गुलाबी ओठांमुळे कोणाच्याही सौंदर्यात भर पडते. परंतु जर ओठ काळे असतील तर आकर्षक चेहराही सुंदर दिसत नाही. ओठांच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा जास्त सजग असतात.
ओठ चांगले दिसण्यासाठी महिला डझनभर कॉस्मॅटिक्स वापरतात. लीप ग्लॉस, लीप बॉम आणि लिपस्टिक यासारखे कॉस्मॅटिक्स थोड्या वेळासाठी ओठांना सुंदर बनवतात परंतु यांच्या जास्त वापराने ओठ काळे आणि ड्राय पडू लागतात. यामुळे ओठांना नेहमी गुलाबी ठेवण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे घरगुती उपाय. घरगुती उपायांनी कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ओठ गुलाबी राहतात.

काळे ओठ गुलाबी करण्याचे उपाय...
- मध आणि लिंबू
लिंबाचा रस आणि मध एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवा. हे मिश्रण एक तासभर ओठांना लावून ठेवा. त्यानंतर ओठ स्वच्छ धुवून घ्या. दिवसातून कमीत कमी दोन वेळेस हे मिश्रण ओठांवर लावा. लिंबामुळे ओठांवरील काळसरपणा दूर होईल आणि मधामुळे ओठ कोमल आणि सुंदर होतील.

ग्लिसरीन आणि लिंबू

शुष्क ओठ हे ओठ काळे होण्यामागचे एक कारण असू शकते. ग्लिसरीन आणि लिंबू एकत्रित करून ओठांना लावल्यास ओठांचा काळेपणा दूर होतो. ग्लिसरीनमुळे ओठ जास्त काळ मुलायम राहतात.

पाण्याची कमतरता
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठांची रंगत खराब होते. यामुळे ओठ सुंदर ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

बीट

बीट हे ओठांना गुलाबी ठेवण्यचे प्रभावी औषध आहे. बीटचा एक तुकडा घेऊन ओठांवर रगडा. बीटचा रस एक तासभर ओठांवर लावून ठेवा. एक तासानंतर ओठ स्वच्छ धुवून घ्या. या उपायने ओठ हळूहळू गुलाबी होऊ लागतील.

बदामाचे तेल
दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना बदामाचे तेल लावून झोपा. बदामचे तेल लावल्याने ओठांचा काळेपणा हळूहळू दूर होईल.


काकडीचा रस

ओठांवर नियमितपणे काकडीचा रस लावल्यास ओठांवरील काळसरपणा दूर होईल.

लिंबू
लिंबू एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंटचे काम करते. केवळ लिंबाचा रस ओठांवर नियमितपणे दोन महिने लावल्यास ओठांवरील काळसरपणा दूर होईल.

साखर मिसळून वापरा

लिंबाचा रस आणि साखर एकत्रित करून ओठांवर स्क्रब केल्यास काळे ओठ गुलाबी होतील.


गुलाबपाणी अशा पद्धतीने लावा

मधामध्ये थोडेसे गुलाबपाणी मिसळून हे मिश्रण ओठांना लावावे. दिवसातून तीन वेळेस ही प्रक्रिया केल्यास ओठ गुलाबी होतील.

मध

रात्री झोपण्यापूर्वी ओठांना थोडासा मध लावा. सकाळी गरम पाण्याने ओठ स्वच्छ धुवून घ्या. दही, मध आणि बेसन पीठ एकत्र करून ही पेस्ट ओठांना लावल्यास लाभ होईल.

लिंबू आणि हळद

लिंबाच्या रसामध्ये थोडीशी हळद टाकून हे मिश्रण ओठांना लावा. दहा मिनिटानंतर ओठ धुवून घ्या.


थोडे नवीन जरा जुने