आपल्या पहिल्या बॉयफ्रेंडवर मुली अशा प्रकारे नजर ठेवतात
स्त्री असो की पुरूष. एक गोष्ट सगळ्यांनाच मान्य असते की, पहिले प्रेम हे प्रत्येकासाठी खास असते. भले पूढे ब्रेकअप का झाले असेना. पण पहिले प्रेम हे पहिले असते. परंतु, आपल्याला माहित आहे का, ब्रेकअपनंतरही मुली आपल्या पहिल्या एक्स बॉयफ्रेंडला फॉलो करतात. आपल्याला विशेष वाटेल परंतु, त्या आपल्या बॉयफ्रेंडबाबत सगळी माहिती मिळवत असतात. याशिवायही त्या बरेच काही करतात.
मुली आपल्या एक्स बॉयफ्रेंडला फेसबुकवर चेकआऊट करतात.

त्याच्या स्टेटसवर त्याचे बारीक लक्ष असते. काहिसा वेगळ्याप्रकारचा स्टेटस असल्यास त्यांना असे वाटते की, तो आपल्याला उद्देशुनच टाकलेला आहे.

सोशल साईट्सवरचे त्याचे सर्व फोटे चेक करणे आणि त्याच्यासोबत एखाद्या मुलीचा फोटो असेल तर तिची सर्व माहिती काढणे.

त्याने त्याचा पहिला ग्रुप बदलून नवा ग्रुप तर तयार केला नाही ना? तसेच, बदलला असेल तर कोणत ग्रुप जॉईन केला आहे.

त्याच्या विशिष्ट लुकवरून मित्रांसोबत चर्चा करत राहणे. उदा. असे याने दाडी, केस का वाढवलेत. फारच घाणेरडे दिसते वैगेरे.

बॉयफ्रेंडच्या कपड्यावर मुलींचे विशेष लक्ष असते. त्याने घातलेले कपडे ब्रॉण्डेड आहेत की, नॉन ब्रॉंण्डेड याकडे मुलींचे विशेष लक्ष असते.

बॉयफ्रेंडच्या प्रोफाईल पिक्चरवर किती लाईक आहेत. हे सतत तपासणे. यातही त्याच्या नव्या प्रोफाईल पिक्चरवर किती नव्या मुलींनी लाईक केले आहे. हे पाहण्यात त्यांना विशेष रस असतो.

बॉयफ्रेंडच्या नव्या गर्लफ्रेंडबद्धल चर्चा करणे की, ती आपल्यापेक्षा विशेष सुंदर तर दिसत नाही ना.

एकुणच काय तर ब्रेकअप झाले असले तरीही, मुलींना आपल्या बॉयफ्रेंडमध्ये इटरेस्ट असतो. तो त्याच्यावर प्रेम असतेच म्हणून नव्हे. तर आपल्या नंतर त्याच्या आयुष्यात काही फरक पडला आहे का, हे पाहण्यात.
थोडे नवीन जरा जुने