म्हणूनच रिलेशनशिपमध्ये रोमान्सची गरज असते
रिलेशनशिप म्हटले की प्रेम, मजा-मस्ती हे सगळे आलेच. ते होणे गरजेचे आहेच. मात्र, आजकालच्या प्रोफेशनल लाईफस्टालमुळे लोक खूपच बिझी होत चालले आहेत. ते नेहमीच मानसीक दबावात जगत असतात. त्यामुळे पार्टनरकडे दुर्लक्ष होते आणि कपल्समध्ये दुरावा वाढू लागतो. हा दुरावा कमी करण्यासाठी रिलेशनशिपमध्ये रोमान्स कामी येतो. म्हणूनच रिलेशनशिपमध्ये रोमान्सची गरज आहे.
अनेक लोक मनात नसताना जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी रोमान्स करतात. परंतु, त्यात नात्याची ओढ नसल्यामुळे अशा रोमान्समध्ये एक कृत्रिमता येते. जी नात्यात आणखिच दूरावा निर्माण करते. पण, काही वेळा साठी तुम्ही जर तुमचे नोकरी, व्यवसाय, आर्थिक ताण तणाव बाजूला ठेऊन जोडीदाराला वेळ दिलात. तर तुम्हाला रोमान्स करण्यासाठी निमित्त शोधावे लागणार नाही.


खरेतर रोमान्स ही ठरवून करण्याची गोष्टच नाही. ती तुमच्याकडून आपोआप होते. गरज असते ती फक्त समोरच्या व्यक्तिशी मनापासून कनेक्ट होण्याची. तुम्ही एकदा का समोरच्या व्यक्तिशी कनेक्ट झाला की तुमचे काम फत्ते झालेच म्हणून समजा.
रोमान्स करण्याचे फायदे

आपला आणि जोडिदाराचा मूड फ्रेश होतो.

ताणतणावापासून सुटका होते.

मन आनंदी होते.

दूरावा दूर होऊन जोडीदार आणखी जवळ येतो.

मनापासून चर्चा करता येते. संवाद वाढला की, अनेक कठिण प्रश्नांवर मिळून पर्याय शोधता येतात.

समज-गैरसमज दूर होतात.

भविष्याच्या दिशेने महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होते.

जोडिदाराचे मन कळते.

कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे ते कळते.

आपल्या प्रोफेशनल लाईफमधील समस्याही आपल्या जवळच्या व्यक्तिला शेअर केल्याने सुटू शकतात.

चुका कळतात मार्गदर्शन मिळते.

थोडे नवीन जरा जुने