आदिवासी लोकांचे 'हे' खास आरोग्यादायी उपाय
सध्याच्या आधुनिक युगात असे अनेक लोक आहेत, जे आयुर्वेदिक आणि पारंपारिक उपचारांवर विश्वास ठेवतात. प्राचीन काळापासून उपयोगात आणले जाणारे हे उपाय करून छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार केले जाऊ शकतात. आजही शहरापासून दूर राहणारे आदिवासी लोक आयुर्वेदिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करतात.
पाताळकोट येथील आदिवासी लोकांच्या माहितीनुसार बांबू झाडांच्या पानांचा काढा तयार करून पिल्यास स्त्रियांची थांबलेली मासिक पाळी पुन्हा सुरु होते. मधासोबत बांबूच्या पानांचा रस घेतल्यास खोकला बारा होतो.


आदिवासी लोकांच्या माहितीनुसार, मोहाच्या झाडाच्या सालीपासून तयार केलेला ५० मि.ली. काढा दररोज पिल्यास चेहऱ्यावरील काळे डाग दूरू होण्यास मदत होते. डाँग गुजरात येथील आदिवासी या काढ्याने शरीरातील गाठींवर उपचार करतात. मोहाच्या सालीचे चूर्ण तूप किंवा लोण्यासोबत खाल्ल्यास वीर्य वृद्धी होते.


आदिवासी शिसम झाडाच्या पानांपासून तयार केलेले तेल जखमेवर लावतात. यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

आदिवासी लोकांच्या माहितीनुसार शिसम झाडाची कवळी आणि हिरवी पानं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावीत. त्यानंतर सकाळी हे पानं वाळवून घ्यावेत. बारीक खडीसाखरेसोबत या पानांचे सेवन केल्यास विर्याशी संबंधित आजारामध्ये फायदा होईल.


कंबरदुखी, सांधेदुखीचा आजार दूर करण्यासाठी शाल्मली झाडाची पानं अद्रक आणि कापूरसोबत (कर्पूर) समान मात्रेमध्ये घेऊन बारीक करून याचा लेप तयार करा. हा लेप कंबरेवर आणि सांध्यांवर लावल्यास लाभ होईल.

जुलाब होत असतील तर शाल्मली झाडाच्या सालीचे चूर्ण ( ५-१० ग्रॅम) साखरेसोबत घेतल्यास लगेच आराम मिळेल.

पाताळकोट येथील आदिवासी लोकांच्या माहितीनुसार शाल्मलीच्या मुळांपासून तयार केलेले चूर्ण दिवसातून ३ वेळेस घेतल्यास संधिवातामध्ये आराम मिळतो.

फुलझाडांपैकी एक पानझडी वृक्ष.

शाल्मली : संयुक्त पाने, फुले व कळ्यांसह फांदी.
सैबा प्रजातीत दहा जाती असून त्यांपैकी भारतात फक्त एकच जाती आढळते.
भारतात (गुजरात, खानदेश, पुणे, कोकण) बहुतेक उष्ण भागांत हे झाड आढळते. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा किंवा मंदिराजवळ हे झाड लावलेले असते.

थोडे नवीन जरा जुने