अशा प्रकारे करा वापर गरम आणि थंड गोष्टींचा !


आपल्या खांद्याजळ या स्नायूंमध्ये, लिगामेंटस किंवा स्नायुबंधामध्ये दुखले तर त्याला खांदेदुखी किंवा खांद्याचा आथियिटिस म्हणतात. एकदा का खादा दुखायला लागला तर कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. अलीकडील काळात बहुतेक सर्व वयाच्या लोकांना केव्हा ना केव्हा तरी खांदेदुखीचा त्रास होतोच, याचे कारण बदललेली जीवनशैली, ज्या व्यक्ती दीर्घकाळ संगणक, लॅपटॉप, स्मार्टफन, टॅबलेट वापरतात त्या व्यक्तींना खांदेदुखीचा त्रास प्रकर्षाने जणवू शकतो, खांदेदुखीसाठी अनेक गोष्टी, सवयी आणि परिस्थिती कारणीभूत ठरु शकतात. 

अधियिटिस, कुर्चा मोडणे, खांद्याचे हाड मोडणे, फ्रोजन शोल्डर आणि मणक्याची हानी अशी अनेक कारणे खांदेदुखी होण्यास कारणीभूत ठरु शकतात. काही वेळी खांद्याला येणारी सूज, हात न झालणे, सांध्याजवळची जागा नाजूक होणे अशी लक्षणही दिसू शकतात. आपल्याला घरातच खांदेदुखीची समस्या जाणवत असेल तर काही तंत्र वापरून पाहू शकतो.

खांदेदुखीची नुकतीच सुरुवात झाली असेल तर थंड पदार्थाचा वापर करुन दाह कमी करता येतो. जर खांद्यात खूप कळा येत असतील किंवा दुखत असेल आणि आध्रायटिस सारख्या वेदना होत असतील तर काही गोष्टीचा वापर करा,पंधरा किया वीस मिनिटांसाठी खांद्याला शेक द्या. त्यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळेल, दाह न होत फक्त खांदा दुखत असेल तर गरम शेक घेतल्यास आराम मिळू शकतो .

This way make use of hot and cold things
थोडे नवीन जरा जुने