अशा प्रकारे दूर करा श्वासाची दुर्गंधी !


तोंडाला येणारी दुर्गंधी ही सर्वसाधारण समस्या मानता येईल. त्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा आल्याचा रस मिसळावा. या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाला येणारी दुर्गंधी थांबवता येते. अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे रात्री उशिरापर्यंत जागरण करणं अनिवार्य ठरत आहे. त्यामुळे अनेकांना उष्णतेचे विविध विकार निर्माण होतात. त्यातही तोंड येण्याची समस्या तर अनेकदा निर्माण होते. त्यासाठी पाण्यात हळद टाकून ते थोडा वेळ तसंच ठेवावं. नंतर गाळून घेऊन त्याच्या सहाय्यानं गुळण्या केल्यास या विकारापासून आराम मिळतो. जांभळाची पानं कुटून पाण्यात मिसळून घ्यावीत. या पाण्याने गुळण्या करण्यानेही तोंडाची ही समस्या दूर होते.

दातदुखीची समस्या अधिक प्रमाणात निर्माण होत आहे. दात किडले असतील तर तुळशीच्या पानांच्या रसात कापूर मिसळून त्यात कापसाचा बोळा भिजवून घ्यावा. हा बोळा दुखऱ्या दातात ठेवल्यास दातदुखी दूर होण्यास मदत होते. पोटदुखीसाठीही असेच घरगुती उपाय प्रभावी ठरतात. चिंचेची कोवळी पाने कुटून घ्यावीत. त्यात सैंधव मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे पोटदुखीपासून आराम मिळतो. थोडासा लिंबाचा रस, थोडासा आल्याचा रस आणि थोडी साखर या बाबी एकजीव कराव्यात. त्यानंतर त्यांचे सेवन करावं. या उपायाने पोटदुखी दूर होते आणि त्वरित आराम मिळतो. अशा प्रकारे घरच्या घरी केलेले उपचारही प्रभावी ठरतात.

पाठदुखीने त्रस्त असणाऱ्यांसाठी लिंबाच्या झाडाची मऊ पानं तोडून त्याचा काढा तयार करावा. त्या काढ्यात कापसाचा बोळा किंवा स्वच्छ कपड भिजवून घ्यावं. या गरम कापडाने किंवा कापसाच्या बोळ्याने पाठीला शेक द्यावा. या उपायाने पाठदुखी थांबण्यास मदत होते. तीव्र डोकेदुखी असेल तर लसणाची एक पाकळी सोलून ती चावून खावी. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. कमळ काकडीची कुटून पूड तयार करावी. ही पूड दुधात उकळून घ्यावी. या दुधाचं सेवन केल्यास कंबरदुखीपासून सुटका मिळते.

स्वत:च्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची कितीही काळजी घेतली तरी काही ना काही तक्रारी सुरू असतातच. त्यात किरकोळ स्वरूपाच्या दुखण्यांचं प्रमाण अधिक असतं. अशा दुखण्यांवर दवाखान्यात जाऊन उपचार करणं प्रत्येक वेळी शक्य असतंच असं नाही. शिवाय त्यासाठी खर्चही अधिक करावा लागतो. वास्तविक घरगुती उपायांनी अनेक दुखणी बरी करता येतात. त्यासाठी अशा उपचारांची माहिती प्रत्येकाला असायलाच हवी.

कधी कधी तीव्र थंडीमुळे किंवा अन्य कारणांनी अचानक कानदुखीस सुरुवात होते. अशा वेळी एरंडीची पानं गरम तेलात मिसळून त्याच्या सहाय्यानं कानाच्या आसपास हलका शेक द्यावा. यामुळे कानदुखी थांबण्यास मदत होते. तुळशीची पानं कुटून त्याचा रस तयार करावा. हा रस मंद आचेवर तापवून घ्यावा. थोडासा गरम झाल्यावर तो कानात सोडावा. या उपायानेही कानदुखी थांबण्यास मदत होते. डोळे आल्यास रात्री थोडासा गुळ पाण्यात भिजत टाकावा. सकाळी तो वस्त्रगाळ करून ते पाणी प्यावं. यामुळे डोळ्यांचा त्रास दूर होतो. अशा पद्धतीने काही सोप्या उपायानेही विविध व्याधींपासून घरातील सदस्यांची सुटका करता येते.


Thus remove the stench of breath
थोडे नवीन जरा जुने