कमरेचा बेल्ट घट्ट बांधल्यामुळे तुम्हाला होऊ शकतात "ह्या" समस्या !ज्या लोकांना बेल्ट घट्ट बांधण्याची सवय असते, त्यांना यामुळे कित्येक समस्या होऊ शकतात. म्हणून या तुमच्या सवयीला त्वरित बदलले तर बरे होईल.

ज्या लोकांना बेल्ट घट्ट बांधण्याची सवय असते, त्यांना यामुळे कित्येक समस्या होऊ शकतात. म्हणून या तुमच्या सवयीला त्वरित बदलले तर बरे होईल.

 अ‍ॅसिडिटी वाढते :
दिवसभर घट्ट बेल्ट बांधल्यामुळे तुम्हाला अ‍ॅसिड  रिफलक्सचा धोका राहतो. घट्ट बेल्टमुळे तुमच्या पोटावर दबाव राहताे, ज्यामुळे पचवण्यासाठी बनणारे  अ‍ॅसिड फुप्फुसात आणि घशात जातात. घट्ट बेल्ट बांधणाऱ्यामध्ये छातीत जळजळ, अपचन समस्या असते.

प्रजननक्षमतेवर परिणाम: 
यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे वंधत्वाचा धोका वाढू शकतो. खरं तर घट्ट बेल्ट बांधल्यामुळे पेल्विक एिरयावर दबाव पडतो ज्यामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. हे शुक्रजंतूची संख्या कमी होण्याचे कारण होऊ शकते.

गुडघेदुखीची तक्रार : 
घट्ट बेल्ट बांधणारे पुरुष ज्यावेळी उभे राहतात त्यावेळी त्यांच्या पाठीच्या हाडांवर जास्त दबाव पडतो. यामुळे पाठ आणि कंबर आखडू शकते. जर तुम्ही दीर्घकाळापासून असा बेल्ट बांधत असाल तर गुडघेदुखीची शक्यता होऊ शकते.

Tightening the waist belt can cause you to have "these" problems
थोडे नवीन जरा जुने