दिवसाची सुरुवात चांगल्या प्रकारे करण्यासाठी,ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा !

रोज ऑफिसला किंवा नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी जाताना प्रत्येकाला आपले आवरण्याची घाई झालेली असते . अशा स्थितीत आवरता आवरता प्रत्येक बाबतीत दुसऱ्याला दोष देण्याचे काम आपण त्या घाईतही अगदी हौसेने पार पाडत असतो. असे घडू नये यासाठी काय करावे याविषयी . . .


किल्ल्यांची जागा : घराची किल्ली , ऑफिसची , गाडीची अशा सगळ्या किल्ल्या ठेवण्याची एकच जागा ठेवा . त्याच ठिकाणी किल्ली सापडणार , अशी खात्री तुम्हाला असली पाहिजे , मोबाइल आणि लॅपटॉप आदल्या रात्री चार्ज करून ठेवण्याची सवय लावा .

कपड्यांचे नियोजन : आवश्यकतेनुसार टाय , ब्लेझर निवडून ठेवा , पाकीट , क्रेडिट कार्डस् , रुमाल , पेन या सगळ्या आवश्यक गोष्टी एकाच जागेवर ठेवा . कपडे लॉड्रीतून इस्त्री करून आले असले तरी त्याचे बटन तुटले आहे . कुठे डाग राहिला आहे अशी अवस्था नसल्याचे रात्रीच पाहून ठेवा .
मुलांचे दप्तर , गृहपाठ : मुलाने स्कूलबॅग टाइमटेबलनुसार व्यवस्थित भरलं आहे ना , याची आदल्या रात्रीच खत्री करून घ्या . त्याने गृहपाठ पूर्ण केला आहे सगळ्या वह्या पूर्ण आहेत , त्यावर कोणेतही रिमार्क आलेले नाहीत याची आदल्या दिवशी खात्री करून घ्या .

दुसऱ्या दिवशीचे नियोजन : घरातील बिले भरणे , विम्याचा हप्ता भरण्याची तारीख अशा बारीकसारीक गोष्टी लिहून ठेवा . कितीही कंटाळा आला दुसऱ्या दिवशीचे व्यवस्थित नियोजन करा . त्यावरून उद्या काय - काय गोष्टी करायच्या आहेत आणि लागणार आहेत हे लिहून ठेवा .

To start the day off well, always keep these things in mind
थोडे नवीन जरा जुने