सौंदर्य खुलवणारी हळद
आरोग्याशी निगडित असलेले हळदीचे सर्वच गुणधर्म तुम्हाला माहीत असतील. मात्र, सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे.


हळदीत आढळून येणारा करक्युमिन नावाचा घटक याला पिवळ रंग देतो. तो कलरिंग एजंटप्रमाणे काम करून त्वचेचा रंग खुलवतो.

अँटिसेप्टिकशिवाय हळदीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे हळद त्वचेसाठी उपयुक्त आहे.
हळद अँटिऑक्सीडंटचे काम करते. त्वचादेखील तरुण राहते. त्याचबरोबर त्वचेवरील सुरकुत्या किंवा इतर समस्यांपासूनही बचाव होतो.


पिगमेंटेशन :

जर तुम्हाला पिगमेंटेशनची समस्या असेल तर हळद लिंबाच्या रसात मिसळून दररोज सकाळी हे मिर्शण चेहर्‍यावर लावावे. नियमितपणे लावल्याने पिगमेंटेशनची समस्या दूर होते. घरात लिंबू नसेल तर काकडीचा रसही हळदीसोबत मिसळून लावता येईल.


सुरकुत्या :

जर डोळ्यांच्या आसपास रेघा दिसत असतील तर ताकात हळद मिसळून डोळ्यांच्या आसपास लावून 20 मिनिटे ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे. नियमितपणे असे केल्यास रेघा फिक्या पडायला लागतील.


टाचांच्या भेगा :
टाचांच्या भेगा बुजवण्यासाठी हळद रामबाण आहे. तीन चमचे हळदीत खोबरेल तेल टाकून लेप तयार करावा. तो अंघोळ करण्याच्या 10 मिनिटे आधी टाचांच्या भेगांवर लावावा. एक दिवसआड हळदीत खोबरेल तेलाऐवजी एरंडीचे तेल मिसळून लेप लावावा. हळद हिलिंग एजंटचे काम करेल आणि भेगा लवकर बुजतील.

मृत पेशी :

त्वचेच्या मृत पेशी दूर करण्यासाठीदेखील हळद खूप उपयुक्त आहे. बेसनामध्ये हळद मिसळून पाण्याद्वारे याची पेस्ट तयार करा. अंघोळ करताना संपूर्ण शरीराला लावून हातांनी मालिश करा. दररोज असे केल्याने मृत पेशी दूर होतील आणि त्वचा चमकदार दिसेल.


मुरूम :


हळदीत चंदन पावडर मिसळून पाण्याने पेस्ट तयार करा व चेहर्‍यावर लावा. 10 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. चेहर्‍यावरील मुरूम, पुरळ घालवायचे असतील तर हळदीत मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस टाकून थेट मुरुमांवर लावा. 15 मिनिटांनंतर हलक्या हातांनी स्क्रब करा. नंतर साध्या पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून तीन वेळा स्क्रब करा.
थोडे नवीन जरा जुने