उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावर राहायचं नाही


सिंधुदुर्ग : “मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पेलवत नाही. मध्यावधी निवडणुका होतील. कारण मुख्यमंत्र्यांना पदावर राहायच नाही. शिवसेनेत असंतोष आहे हे मी सांगायला नको. यापूर्वीही मारामारी केली आहे. सत्तेसाठी लाचारी केली हे शिवसैनिकांना आवडलेलं नाही,”अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय कोकण दौरा आज (18 फेब्रुवारी) पूर्ण झाला. या दौऱ्याबद्दल बोलताना नारायण राणे यांनी वरील वक्तव्य केलं 

“कोकणात मच्छिमारांची उपासमार होते आहे. त्यावर ते एकही शब्द बोलले नाहीत. कोकणाचा नवा महाराष्ट्र घडवू या असे मुख्यमंत्री म्हणाले. पण कोकण हे महाराष्ट्रातच आहे,” अशीही टीका नारायण राणेंनी केली.

“मच्छिमारांची उपासमार होतं आहे, त्यावर ते एक शब्द बोलले नाहीत. वृत्तपत्रांनी दोन दिवस नाहक प्रसिद्धी दिली. माझा विरोधाला विरोध नाही. मी कोकणी माणसासाठी बोलतो आहे. कोकणी माणसासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय? असा प्रश्नही नारायण राणेंनी उपस्थितीत  केला.

थोडे नवीन जरा जुने