आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांना अवगत करा....


जीवन जगण्यासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या गुणांना अवगत करणे म्हणजे जीवनाची गुणवत्ता वाढवणे होय . या मध्ये अनेक गुणाचा समावेश असतो व अवगत करण्यासाठी थोर विचारवंताचे चरित्र व कर्म याबद्दल वाचन करणे , त्यातील त्यांचे सर्व चांगल्या गुणांना आत्मसात करणे . तसेच स्वतःला नेहमी एखाद्या कामात गुंतवून ठेवणे गरजेचे वाटते , कारण ' खाली दिमाग शैतान का घर होता है ' म्हणजे वाईट विचार व्यक्तींची प्रगती थांबते व चांगल्या गुणांनाचा ऱ्हास होतो.

आपल्या जीवनात काय मिळवायचे आहे व आपले ध्येय काय आहे . याचा विचार करून ते मिळवण्यासाठी आपले त्यावर लक्ष केंद्रित करणे व त्या दृष्टीकोणातून ज्ञान प्राप्त केल्याने आपण नक्कीच यशस्वी होतो . आपल्या कडून झालेल्या रोजच्या घडामोडींची नोंद , वहीत केल्याने दिवसभरातून आपल्या कडून कोणते योग्य व आयोग्य कार्य हे समजणे व सुंदरवणे सोपे जाते , यातून आपले गुण पारंगत होतात व आपले उत्तम व्यक्तीमत्व घडते . 

त्याच प्रमाणे महत्वाचे म्हणजे संगत आपली संगत , संगत हि नेहमी उत्तम विचारांच्या मित्रांशी , व्यक्तींशी असावी कारण यामुळे आपल्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो .

Understand the qualities you need to live your life
थोडे नवीन जरा जुने