ही पाने तुमच्या सौंदर्यात भर घालतील करा असा उपयोगआयुर्वेदात लिंबाच्या औषधी गुणांचा उल्लेख केलेला आहे. पूर्वी अनेकांच्या दारात लिंबाचे झाड असायचे. आजही अनेक घरे, इमारती, सोसायटीच्या प्रांगणात लिंबाची झाडे आढळतात. कडवटपणा आणि औषधी गुणांमुळे लिंब जुन्या काळापासून सर्वपरिचित आहे. लिंब त्वचेसोबत केसांना निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. दररोजच्या जीवनात लिंबाचा वापर करून निरोगी राहता येईल.
अंघोळीसाठी लिंबाचा वापर
दोन लिटर पाण्यात लिंबाची पन्नासभर पाने टाकावी. पानांचा रंग बदलून पाणी हिरवट होईपर्यंत त्यांना उकळा. हे पाणी गाळून एका बाटलीत भरून ठेवावे. रोज अंघोळ करताना यातील 100 मिली पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळावे. यातील एंटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण त्वचेला होणारे संसर्ग, व्हाइट हेडची समस्या दूर करतात.


नैसर्गिक फेसपॅक
लिंबाची काही पाने आणि संत्र्यांच्या काही साली पाण्यात टाकून उकळा. या पातळ पदार्थात मध, दही आणि सोया मिल्क टाकून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी. या पेस्टमुळे चेहर्‍यावरील त्वचा निरोगी राहते तसेच त्वचेवरील क्रॅक्स, व्हाइट आणि ब्लॅक हेडस नाहीसे होतात. ही पेस्ट आठवड्यातून तीन वेळा लावावी.
केसांच्या समस्येवर उपयोगी

लिंबाची पाने उकळून त्यात मध मिसळावे. ही पेस्ट केस आणि केसांच्या मुळांना चांगल्या प्रकारे लावावी. यामुळे केसांचे कंडिशंड होते. तसेच केसांतील शुष्कपणा, कोंडा कमी होण्यास मदत होते. लिंबाच्या सालीचा उपयोग केसातील कोंडा आणि उवा कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो.


संसर्गात उपयोगी

लिंबात संसर्गविरोधी घटक आणि एनाल्जेसिक प्रॉपर्टीज असतात. हे घटक त्वचेला अँलर्जी आणि संसर्गापासून वाचवतात. लिंबाची पाने उकळवून हे पाणी संसर्ग झालेल्या ठिकाणी लावावे. काही दिवसांत फरक पडतो.

निरोगी शरीरासाठी पुढील काही घरगुती उपाय करून पाहा...

तोंडाचा वास कळण्यासाठी :

तोंडातून वास येतो की नाही हे पाहण्यासाठी जिभेने मनगट चाटावे. काही वेळानंतर मनगटाचा वास घ्यावा.


कावीळवर उपाय :
पपईच्या लहान आणि नरम पानांना वाटून पेस्ट तयार करावी. अर्धा चमचा पेस्ट मधासोबत घ्यावी.कावीळ लवकर बरा होईल.


चेहरा राहील फ्रेश :

रोज सकाळी चेहरा क्लींजरने साफ करावा. यामुळे चेहरा फ्रेश दिसेल. तुम्ही अंघोळ करताना सुद्धा वॉशेबल क्लींजरचा वापर करू शकता.


साखर राहील नियंत्रणात :
एक ग्लास पाण्यात आंब्याची 10 ते 15 पाने उकळून रात्रभर तसेच ठेवावीत. सकाळी उठल्यावर हे पाणी शोधून प्यावे. साखर नियंत्रणात राहते.


थोडे नवीन जरा जुने