त्वचा तरुण ठेवण्यासाठी उपयुक्त टिप्स
आजकाल कमी वयातच त्वचा कमकुवत होताना दिसते. आरोग्यदायी जीवनशैली, पुरेशी झोप यासह कॉस्मेटिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानानेही त्वचा निरोगी ठेवणे सोपे जाऊ शकते. सीटीएम रेजिम वापरा. त्वचा दिवसातून दोन वेळा धुवा. अल्कोहोल-फ्री टोनरने स्कीनला नवे रूप देण्यास मदत मिळेल.


जाणून घ्या, त्वचा तरुण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणा ठरणाऱ्या काही प्रॉडक्ट्सची माहिती...

सनस्क्रीन :
ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीनचा वापर करा. त्यात एसपीएफ कमीत कमी 30 असावे. सनस्क्रीनमध्ये अँटी ऑक्सिडंट आहेत अथवा नाही, हे तपासून पाहा. लहान आकारातील खरेदी केल्यास कोठेही नेता येणे सोपे जाते.


मॉइश्चरायझर व डे क्रीम :
बॉडी लोशन किंवा डे क्रीम खरेदी करताना लेबलवर अँटी ऑक्सिडंट्स आणि बोटॅनिकल अँक्सट्रेक्ट्सची माहिती पाहा. अँटी ऑक्सिडंट्स आणि बोटॅनिकल्स यांना जीवनसत्त्वे आणि जैविके या दोन प्रकारांत विभागता येईल.


सेरम, नाइट क्रीम :
हे रेटिनॉइड्स, एएचए आणि पेप्टाइड्सचे कॉम्बिनेशन्स असतात. यापैकी रेटिनॉइड ट्रिटिनॉइन हे प्रभावी आहे. मात्र, त्वचातज्ज्ञांना विचारूनच वापरा त्वचेतील पेशींची नैसर्गिकरीत्या निर्मिती करण्यासाठी पेप्टाइड्सची मदत होते.
जाणून घ्या, कोणत्या वयात काय लावावे -


तुमचे वय 20 ते 30 दरम्यान असल्यास एल-अँस्कॉर्बिक अँसिड, एएचए, रेटिनॉल बूस्टर आणि इलास्टिनसारखे घटक अँक्टिव्ह उत्तम ठरतील.

तुमचे वय 30 ते 40 दरम्यान असल्यास क्रीम आणि सिरममध्ये हायअँल्युरॉनिक अँसिड, रेटिनाल्डिहाइड, टोकोफेरिल, पेप्टाइड-व्हिटॅमिन सी, सायट्रिक अँसिड आणि अँमिनो पेप्टाइड्स वापरा. हे विची लिफ्टअँक्टिव्ह सीएक्सपी टोटल आणि आईज अँटी-रिंकल क्रीम, ओले रीजनरिस्ट नाइट क्रीम आणि सेरम मिळतात.

तुम्ही पन्नाशीत असाल तर सीटीएम रेजिम लावा. नाइट क्रीममध्ये आणि सिरममध्ये रेटिनॉल बूस्टर्स, अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असावे. तसेच यूबीक्विनोन आणि ट्रेटिनॉइनसारखे अँक्टिव्ह असावेत. हे विची लिफ्टअँक्टिव्ह रेटिनॉल एचए नाइट व डीसीएल डर्मेटोलॉजिक कॉस्मेटिक लॅबोरेटरीज वायक्यू स्ट्राटममध्ये असतात.थोडे नवीन जरा जुने