विश्वास नांगरे पाटील यांची कारकीर्द
अनेक तरुण विश्वास नांगरे पाटलांना आपला आदर्श मानतात. स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणारे अनेक तरुण विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करतात.


नांगरेपाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील आहेत. त्यांचा खडतर प्रवास ऐकून अनेकांना जीवनात काहीतरी करून दाखविण्याची नवी उमेद मिळते.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांना ते मदत करतात.

विश्वास नांगरे पाटील यांची आतापर्यंतची कारकिर्द अशी

नांगरेपाटील यांची सुरुवातीलाच लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर ते अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक होते.

पुढे त्यांच्याकडे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी मुंबई पोलीसदल उपायुक्त म्हणूनही कामगिरी बजावली आहे.

त्यानंतर ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी त्यांची नियुक्ती झाली. त्यावेळी तेथील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती.

पुढे अप्पर(अतिरिक्त -) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र येथे झाली होती. नांगरे पाटील नाशिकमध्ये येऊन लवकरच नाशिक शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.थोडे नवीन जरा जुने