स्मरणशक्ती वाढवायची आहे ? मग हे नक्की वाचा...
पिझ्झा ते सँडविचपर्यंत प्रत्येक आवडत्या पदार्थात आज ऑलिव्हचा समावेश आहे. हे फक्त चवच वाढत नाही तर ते आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिकदेखील आहेत. ऑलिव्ह आणि ऑलिव्ह ऑइलने हळूहळू भारतीय जेवणात खास स्थान निर्माण केले आहे. तज्ज्ञांच्या मते, दररोज मर्यादित प्रमाणात ऑलिव्हचे सेवन करणे आरोग्यासाठीही चांगले असते, परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. जाणून घेऊया यापासून होणार्‍या फायद्यांविषयी..


स्मरणशक्ती बळकट होते

ऑलिव्हमध्ये पॉलिफेनल्स असतात. हे एक नैसर्गिक रसायन असून मेंदूचा ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतो. मॅसाच्युसेट्स विद्यापीठाद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, दररोज ऑलिव्हज खाल्ल्याने स्मरणशक्तीमध्ये 25 टक्क्यांपर्यंत सुधारणा होते.


सुरकुत्या कमी होतात

दररोज मर्यादित प्रमाणात ऑलिव्हचे सेवन केल्याने चेहर्‍यावरील सुरकुत्या 20 टक्क्यांपर्यंत कमी होतात. खरे तर यामध्ये असलेले ऑलिक अँसिड त्वचा मऊ आणि निरोगी ठेवते. याशिवाय ऑलिव्ह व्हिटॅमिन ‘ई’चेसुद्धा चांगले स्रोत आहेत.

ताकद मिळते

एक कप ऑलिव्हमध्ये 4.4 मिलिग्रॅम लोह असते. लोहाच्या मदतीने फॅटचे रूपांतर उर्जेत होते आणि हिमोग्लोबीनही वाढते.


मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अँसिड आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्यामुळे ऑलिव्ह वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. त्यामुळे हृदयरोगापासून बचाव होतो.


ऑलिव्ह हा ओलिएसी कुळातील मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष आहे. इंडियन ऑलिव्ह (ओलिया फेरूजिनिया) आणि यूरोपीय ऑलिव्ह (ओलिया यूरोपिया) या ऑलिव्हच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. इंडियन ऑलिव्ह भारतात काश्मीर ते कुमाऊँ या हिमालयीन प्रदेशात समुद्रसपाटीपासून २,४०० मी. उंचीपर्यंत आढळतो.


थोडे नवीन जरा जुने