वजन कमी करायचं ? पण व्यायामाचा कंटाळा येतोय मग हे करा
लठ्ठपणामुळे सध्या तरुणवर्ग त्रस्त झाला आहे. कमी वयातच यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक लोक सुरुवातीला लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करतात परंतु लठ्ठपणा वाढल्यानंतर तो कमी करण्यासाठी तासंतास घाम गाळतात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी खान-पानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही नैसर्गिक पदार्थांचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते.

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करणे शक्य नसेल तर पुढे सांगितलेले छोटे-छोटे उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी वजन कमी होईल तसेच नियंत्रणात राहील.

भाज्या आणि फळांमध्ये कॅलरींचे प्रमाण कमी असते, यामुळे यांचे सेवन अधिक करावे. केळ आणि चिकू खाऊ नका, यामुळे वजन वाढते. पुदिना टाकून बनवलेला चहा पिल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

जेवतांना टोमॅटो आणि कांद्याचा सॅलड मीठ टाकून खावा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी, ए आणि लोह पोटॅशिअम, लायकोपीन आणि ल्युतीन हे पोषक तत्व मिळतील.

पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.


आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास, कंबर लहान होईल.

लठ्ठपणा कमी होत नसेल तर जेवताना हिरवी किंवा लाल मिरची अवश्य खावी, यामुळे वाढते वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. एका संशोधनानुसार वजन कमी करण्यासाठी मिरची उत्तम उपाय आहे.


दोन मोठे चमचे मुळ्याच्या रसामध्ये मध मिसळून हे मिश्रण पाण्यातून घ्या. नियमित हा उपाय केल्यास एक महिन्यात फरक दिसून येईल.

सदाफुलीच्या झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.

दररोज सकळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध मिसळून पिल्यास शरीरातील वसाची मात्रा कमी होते.


फक्त गव्हाची पोळी खाण्यापेक्षा, गहू, सोयाबीन आणि हरभरा मिश्रित मिठाची पोळी जास्त लाभदायक आहे.

एक चमचा पुदिन्याच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळून सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहील.

सकाळी झोपेतून उठताच २५० ग्रॅम टोमॅटो रसाचे सेवन २-३ महिने केल्यास वजन कमी होईल.थोडे नवीन जरा जुने