बैठी जीवनशैली असल्यामुळे वजन वाढतय? मग हे नक्की वाचा
लठ्ठपणाचा खिन्नतेशी फार मोठा संबंध आहे. कारण वजन आणि खिन्नता या दोन्ही कारणांमुळे अनेक प्रकारच्या मनोविकृती निर्माण होण्याची शक्यता असते. खिन्न असलेल्या लोकांची जीवनशैली बैठी असल्याचे दिसून येते व खाण्याच्या सवयीदेखील चांगल्या नसतात, जसे अति खाणे ज्यामुळे लठ्ठपणा वाढीस लागतो.
चांगल्या पगाराची नोकरी, प्रेमळ कुटुंब आणि काळजी घेणारा मित्रपरिवार.. २७ वर्षीय फॅशन डिझायनर अंकिता गर्गचे नराश्यग्रस्त होण्यापूर्वीचे जीवन एकदम आनंददायी होते. परंतु हे सगळे तिला खिन्नता येण्यापूर्वीचे जीवन होते. प्रसन्नचित्त स्वभावाच्या अंकिताचे वागणे आता सतत उदासीन व नकारात्मक असल्याचे जाणवत होते. ती मित्र-परिवार व कुटुंबातील सदस्यांबरोबर राहाणे टाळत होती.

घरात एकटंच राहणे, कोणातही मिळून मिसळून राहणे पुढे पुढे टाळू लागली. तिच्या अशा वागण्याने तिच्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर असे लक्षात आले की तिच्या नराश्याच्या लक्षणांमागे प्रामुख्याने तिचे वाढलेले वजन कारणीभूत आहे.

लठ्ठपणाचा खिन्नतेशी फार मोठा संबंध आहे. कारण वजन आणि खिन्नता या दोन्ही कारणांमुळे अनेक प्रकारच्या मनोविकृती निर्माण होण्याची शक्यता असते. लठ्ठ लोक विशेषत: महिला अनेकदा स्वत:ला कमी लेखतात. परिणामी त्यांच्यामध्ये आत्मसन्मानाची कमतरता व उदासीनता दिसून येते.

याशिवाय खिन्न असलेल्या लोकांची जीवनशैली बैठी असल्याचे दिसून येते व खाण्याच्या सवयीदेखील चांगल्या नसतात, जसे अति खाणे ज्यामुळे लठ्ठपणा वाढीस लागतो.

लठ्ठपणाचा जागतिक दर दुप्पट झालेला आहे. जगामध्ये मृत्यूच्या महत्त्वपूर्ण कारणांमध्ये लठ्ठपणा हा पाचव्या क्रमांकावर आहे.

कमी वजनाच्या लोकांपेक्षा लठ्ठ लोकांचे मृत्यू अधिक होताना दिसतात. दुसरे म्हणजे यामुळे संपूर्ण जगभरातील ३५० दशलक्ष लोकांमध्ये खिन्नतेचा प्रभाव देखील असल्याचा अंदाज काढण्यात आलेला आहे.

आरोग्याच्या धोक्याबाबत बोलायचे झाल्यास घेतलेल्या कॅलरीज, न खर्च केलेल्या कॅलरीज यामध्ये ऊर्जेचा जो असमतोल असतो, त्यामुळे लठ्ठपणा येतो. वास्तविक शरीरामधील कॅलरीमध्ये वाढ होते व त्याबरोबर पुरेसा शारीरिक व्यायाम होत नाही, त्यामुळे शरीरात जास्तीचा मेद वाढीस लागतो. लठ्ठ लोकांना खिन्नतेचा धोका अधिक असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अति खाण्याव्यतिरिक्त, शारीरिक हालचालीची कमतरता व असमाधान यामुळे वजन वाढते. त्यामुळे खिन्नता येते व अशा लोकांच्या रक्तातील कॉर्टसिॉल संप्रेरकाची पातळी अनियमित राहाते. यामुळे अति खाणे व मेदयुक्त उतीचे उत्पादन वाढते.

जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल केल्याने शरीराचे वजन योग्य ठेवण्यास मदत होत असली तरी देखील संप्रेरकाच्या (हार्मोन समस्या) अनुवंशिक किंवा गुडघ्यांच्या समस्या ज्यामुळे शारीरिक हालचाली कठीण होतात. त्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रियादेखील कठीण होते व काही वेळा अशक्य होते आणि अशा वेळी बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेसारख्या वैद्यकीय प्रक्रिया महत्त्वाचे कार्य करतात.

अत्यंत लठ्ठ असलेल्या लोकांमध्ये आहारातील बदल किंवा व्यायामामुळे फायदा होत नाही किंवा त्यांच्या लठ्ठपणास एखादे आजारपण कारणीभूत असते तेव्हा अशा लोकांसाठी बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेचा पर्याय असतो. थोडाफार शारिरिक व्यायाम, निरोगी आहार व पूरक अन्न यांच्या जोडीने बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया वजन कमी होण्यामध्ये उपयुक्तदिसून येते.

व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होणा-या परिणामांवर आधारित एक वर्षाचा अभ्यास पबमेडमध्ये प्रकाशित करण्यात आला त्यानुसार, बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेनंतर महिला रुग्णांमध्ये खिन्नता कमी झाल्याचे उघडकीस आले आहे. बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया वजन कमी करण्याची व खिन्नतेचे व्यावस्थापन करण्याची परिणामकारक पद्धती असल्याचे वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झाले आहे.

अलीकडे झालेल्या वैद्यकीय प्रगतीमुळे बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेसारखी गुंतागुंतीची पद्धती कमी आक्रमी, सुरक्षित आणि अत्यंत परिणामकारक असल्याचे दिसून येतं. बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया एक तर जठराचा आकार (गॅस्ट्रिक बँडिंग) कमी करून, कॅलरी घेण्यावर नियंत्रण मिळवून एकंदर जठरामध्ये जाऊ न देण्याचा (रॉक्स-एन-वाय) उपाय करण्याचे काम करते किंवा जठराचा भाग (स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी) काढून टाकते. तिन्ही पद्धतीमध्ये थोडाफार फरक असला तरीदेखील तिन्ही प्रकारांमध्ये जठरांमध्ये जठराचा आकार कमी होतो. ज्यामुळे अन्न घेणे कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
थोडे नवीन जरा जुने